मास्टर माइंड अक्षय केळकरला पाहून बिग बॉस म्हणाले.. तू या खेळाचे..

मुंबई: बिग बॉस मराठीच्या घरातील एक मास्टर माइंड चेहरा म्हणजे अक्षय केळकर. अक्षय केळकर हा मालिका जगतात गाजलेला कलाकार. बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री घेतल्या पासूनच त्याने स्वतःचं वेगळेपण दाखवलं. त्याने वाद घातले, राडे केले पण त्याहीवेळी त्याने स्वतःची बाजू उत्तम पद्धतीने राखली. प्रत्येक टास्क त्याने डोकं लावून खेळला म्हणूनच तो आज टॉप सहा मध्ये आला. यानिमित्ताने त्याचा प्रवास उलगडताना बिग बॉसने त्याचे भरभरून कौतुक केले.

जवळपास ९३ दिवसांचा टप्पा पार करून अक्षय केळकर बिग बॉसच्या मराठीच्या शेवटच्या आठवड्यात पोहोचला. अक्षयने यासाठी प्रचंड मेहनत घेतली, खूप हुशारीने तो खेळला. त्याने कधी कुणाची मनं दुखावली नाहीत. तो कायम सगळ्यांशी जुळवून घेत राहीला. अगदी ज्या सदस्यांचे आणि त्याचे पटले नाही त्यांच्याशीही त्याने जुळवून घेतले. मात्र जे पटले नाही त्याला विरोधही केला. त्यामुळे अक्षयचा स्वभाव आणि खेळ पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांना आवडला. त्यामुळे अक्षय हा टॉप 5 मधला खेळाडू आहे असे त्याचे कौतुक होऊ लागले.अक्षयने पहिल्या दिवसापासूनच टास्क मध्येही उत्तम खेळी केली. साम दाम दंड भेद वापरुन तो जिंकत राहिला. मग तो कॅप्टनसी टास्क असो किंवा काहीही. त्याच्या खेळाच्या पद्धतीमुळेच त्याला सगळे मास्टर माइंड म्हणून लागले. म्हणून नुकतेच बिग बॉसनेही अक्षयचे कौतुक केले.या शेवटच्या आठवड्यात बिग बॉस सहाही स्पर्धकांचा आजवरचा प्रवास दाखवत आहेत.त्यांचे अभिनंदन करत आहेत.यासाठी बिग बॉसच्या घरातच एक खास सेट उभारण्यात आला आहे, जिथे तो स्पर्धक येताच रोषणाई होते, फटाके फुटतात आणि त्याचे जंगी स्वागत होते. असेच स्वागत काल अक्षयचे झाले.यावेळी बिग बॉस म्हणाले, 'एखाद्या चित्रकाराचा स्वभाव जसा चित्रात उमटतो.. तसंच आपल्या खेळाच एक कलरफुल चित्र अक्षयने रेखाटलं', अशा शब्दात त्याचं कौतुक केलं. एवढंच नाही तर त्याच्यासाठी बनवलेल्या व्हिडिओमध्ये त्याला 'लव्हर बॉय', 'खिलाडी नंबर 1', 'शिकारी नं 1' अशा उपमा देण्यात आल्या. त्यामुळे आता कोण विजेता होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने