‘RRR’ चं हॉलिवुड दिग्दर्शक जेम्स कॅमेरूनने कौतुक केल्यावर आलिया भट्टची पोस्ट चर्चेत; म्हणाली…

मुंबई:  एस. एस. राजामौली दिग्दर्शित दाक्षिणात्य चित्रपट ‘RRR’’ची सध्या जागतिक स्तरावर चांगलीच चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने ओरिजनल साँगचा अवॉर्ड जिंकला. त्यानंतर आता चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ‘RRR’’ने बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्मसाठी क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड जिंकला आहे.सध्या या चित्रपटातील कलाकारांचे देशातच नव्हे तर जगभरातुन कौतुक आहे.प्रख्यात दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे यावरच चित्रपटातील कलाकार आलिया भट्टने पोस्ट शेअर केली आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर जेम्स कॅमेरून यांनी कौतुक केलेल्या ट्वीटचा स्क्रिनशॉट टाकला आहे त्यावर एक सुंदर सकाळ कॅप्शन दिला आहे.एस. एस. राजामौली यांच्या ‘RRR’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावत इतिहास रचला. टेलर स्विफ्ट, रिहाना, लेडी गागा यांच्यासारखे दिग्गजांची गाणी स्पर्धेत असताना ‘सर्वोत्तम चित्रपट संगीत’ या प्रकारात ‘आरआरआर’ने बाजी मारली.या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांनी १९२० मधील ब्रिटिशकालीन भारतातील स्वतंत्र सेनानी कोमाराम भीम आणि अल्लूरी सीतारामाराजू यांच्या भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्यासह ब्रिटीश कलाकार रे स्टीवेन्सन, एलिसन डूडी आणि ओलिविया मॉरिस यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने