मुलीच्या जन्मानंतर आयुष्यात झालेल्या बदलांवर पहिल्यांदाच मोकळेपणानं बोलली आलिया..म्हणाली..

मुंबई:  'गंगूबाई काठियावाडी' फेम आलिया भट्टनं ६ नोव्हेंबर २०२२ रोजी आपली मुलगी राहाला जन्म दिला. ती आई बनली आणि रणबीर कपूर बनला पप्पा. नीतू कपूर आणि सोनी राझदान आजी तर महेश भट्ट आजोबा...रिदिमा..करिष्मा..करिना कपूर बनल्या आत्या...अख्खं कपूर कुटुंब आनंदात न्हाऊन निघालं.पण त्यासोबतच आलिया आणि रणबीर च्या आयुष्यात पालक म्हणून खूप मोठे बदल पहायला मिळाले. आलियानं तर मीडियासमोर आपल्या शारिरीक बदलांविषयी याआधीच संवाद साधला होता.आलिया भट्टनं राहाला जन्म दिल्यानंतर योगा करायला सुरुवात केली आहे. तिनं खास योगा क्लास त्यासाठी लावला आहे. 
तिनं प्रसूतीनंतर लवकरच आपल्याला फीट केलेलं दिसत आहे. अद्याप तिनं राहा कपूरचा चेहरा मीडियासमोर आणलेला नाही आणि पुढील एक वर्षापर्यंत ती आपल्या मुलीचा चेहरा समोर आणणार नाही अशी देखील बातमी आहे. आणि तशा सूचना आलिया आणि रणबीरनं मीडियाला देखील दिल्या आहेत. असो...आता समोर आलं आहे ते मुलीच्या जन्मानंतर आलियाच्या आयुष्यात झालेले काही मोठे बदल.आलियानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिनं सांगितलं होतं की आई झाल्यानंतर तिच्यात खूप बदल झाले आहेत. पोस्टमध्ये तिनं लिहिलं होतं की-''आई झाल्यानंतर माझ्यात खूप बदल झाले. माझं शरीर,माझे केस,माझे स्तन,माझी त्वचा,माझ्या प्रायोरिटीज आणि माझ्यातील भीती ..सारंच बदललं..आई बनल्यानंतर माझं मन खूप खंबीर झालं आहे आणि खूप प्रेमळ झालंय''.आलिया लवकरच आपल्याला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात रणवीर सिंग सोबत दिसणार आहे, 'तख्त' सिनेमात आलिया जान्हवी कपूर,करीना कपूर,भूमी पेडणेकरसोबतही दिसणार आहे. त्यानंतर लवकरच ती हॉलीवूड सिनेमातही पदार्पण करत आहे. गॅल गॅडोटसोबत ती 'हार्ट ऑफ स्टोन'मध्ये दिसणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने