'तुम्हाला शाहरुखचा कंटाळा कसा येत नाही, तो तर सारखा...' पाकिस्तानच्या अलीची जळजळीत प्रतिक्रिया

मुंबई: बॉलीवूडचा किंग खान शाहरुख याचा पुढच्या आठवड्यामध्ये पठाण प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्याची गेल्या तीन वर्षांपासून चर्चा आहे. मोठ्या प्रतिक्षेनंतर शाहरुख प्रेक्षकांसमोर येणार आहे. मात्र पठाणवरुन वादालाही सुरुवात झाली आहे. देशभरात या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी होताना दिसते आहे.देशभरातील काही राज्यांमध्ये पठाणवरून थिएटर्समध्ये गदारोळ झाल्याचे दिसून आले आहे. गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये शाहरुखच्या पठाणला मोठ्या प्रमाणावर विरोध होत असल्याचे दिसून आले आहे. अयोध्येतील महंतांनी तर शाहरुखला जीवे मारण्याची धमकीच दिली होती. आता यासगळ्यात पाकिस्तानच्या एका अभिनेत्याची भर पडली आहे.


पाकिस्तानी अभिनेता अली खानची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यानं किंग खानवर केलेली टिप्पणी ही चाहत्यांना काही आवडली नाही. म्हणून अली खानला ट्रोल देखील करण्यात आले आहे. अली खान हा तर ब्रिटिश वंशाचा आहे. मात्र तो पाकिस्तान आणि भारतातील फिल्म इंडस्ट्रीमध्ये अॅक्टिव्ह असल्याचे दिसून आले आहे. त्यानं शाहरुखच्या अभिनयाची थट्टा उडवली आहे.तुम्हाला शाहरुख सारख्या ओव्हर अॅक्टिंग करणाऱ्या अभिनेत्याचा कंटाळा कसा येत नाही असा प्रश्न नेटकऱ्यांना विचारला आहे. विशेष म्हणजे अली शाहरुखसोबत डॉनमध्ये दिसला होता. त्यानं तर शाहरुखविषयी बोलताना म्हटले आहे की, तो नेहमीच क..क....क...किरण असं करतो आणि त्याच्या अभिनयाला पसंती मिळते, चाहतेही तो अभिनय वर्षानुवर्षे पाहतात.शाहरुखनं त्याच्या त्या डर चित्रपटामध्ये अशाप्रकारचा अभिनय का केला होता याचं उत्तर मला अजुनही मिळालेलं नाही. मी ज्यावेळी त्याला भेटलो होतो तेव्हा तो मला फारच अजब वाटला होता. शाहरुखचा स्वभाव मला वेगळा वाटला. आणि मला खूप वेळ त्या सीनसाठी थांबावे लागले होते. तो किस्सा होता डॉन २ च्या वेळचा.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने