देशातल्या प्रत्येकानं आपलं जीवन पंतप्रधान मोदींप्रमाणं जगावं; असं का म्हणाले अमित शाह?

कर्नाटक: केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह  सध्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. हुबळीतील कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान मोदींचंजोरदार कौतुक केलं.बीव्हीबी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 'अमृत महोत्सवा'ला संबोधित करताना शाह म्हणाले, 'प्रत्येकानं आपलं जीवन पंतप्रधान मोदींप्रमाणं आपल्या देशासाठी जगलं पाहिजे आणि भारताला जगातील प्रथम क्रमांकाचा देश बनवण्यासाठी काम केलं पाहिजे.'आगामी निवडणुका लक्षात घेऊन शाह कर्नाटक दौऱ्यावर असल्याचं मानलं जात आहे. 




कर्नाटकातील हुबळी-धारवाड आणि बेळगाव इथं पक्षानं आयोजित केलेल्या रोड शोसह विविध कार्यक्रमांमध्ये शाह सहभागी होणार आहेत. आपल्या दौऱ्यात गृहमंत्री बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर विधानसभा मतदारसंघात जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत.भाजपतर्फे आयोजित अनेक कार्यक्रमांमध्ये शाह सहभागी होतील. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आणि पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शाह यांचा हा दौरा असणार आहे. यादरम्यान शाह कर्नाटकातील पक्षाच्या विस्तारावरही लक्ष केंद्रित करतील आणि नवी रणनीती आखू शकतात, असं बोललं जातंय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने