काँग्रेसचे नेते अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर? निलंगेकर म्हणतात..

मुंबई: काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचे वक्तव्य आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं. आमदाराच्या या वक्तव्यामूळे लातुरच्या राजकारणात खळबळ उडाली. राजकीय वारसा आणि सत्तेचा पायंडा शाबूत ठेवण्यासाठी आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हंटलेलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.भाजप युवा मोर्चाच्या मेळाव्यात निलंगेकर यांनी बोलताना म्हणाले की, काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर आहेत. आपला राजकीय वारसा आणि सत्तेचा पायंडा शाबूत राखण्यासाठी अमित देशमुख भाजपाच्या वाटेवर असल्याचं निलंगेकर यांनी म्हंटलं आहे. पुढे बोलताना निलंगेकर म्हणाले की, जरी अमित देशमुख भाजपमध्ये येण्यास इच्छूक असले तरी मात्र आम्ही त्यांना पक्षामध्ये घेणार नाही.लातुरच्या राजकारणात देशमुख घराण्याचं चांगलंच वर्चस्व आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. लातुर जिल्ह्यात देशमुख घराण्याला मोठा जनाधार लाभला आहे. मात्र अमित देशमुखांनी काँग्रेसला राम राम करून कमळ हाती घेतल्यास हा काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो.

तर निलंगेकर पुढे बोलताना म्हणाले, काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांचा भाजप प्रवेश माझ्या युवा कार्यकर्त्यांना आवडणार नाही, असे भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे देशमुख यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर पडदा पडला आहे.तर देशमुख भाजपात येणार नाहीत व त्यांना आम्ही घेत नाही. देशमुख भाजपत आलेले माझ्या युवा कार्यकर्त्यांना आवडणार नाही. देशमुख हे लातूरचे प्रिन्स राजकुमार आहेत. सतत सत्तेत राहावे, अशी त्यांची इच्छा आहे. असे असले तरी जनतेचे प्रश्न कधीच देशमुख यांनी मांडले नाहीत असंही ते म्हणाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने