'तू बाजूला हो मला हात वर करायचाय', शाहांची स्टेजवर दादागिरी,

मुंबई: राजकीय नेत्यांबरोबर फोटो काढण्यासाठी अनेक कार्यकर्ते उत्सुक असतात. तर अनेकवेळा प्रयत्न करूनही कार्यकर्त्यांना आपल्या आवडत्या नेत्यांसोबत फोटो काढता येत नाही. यासंदर्भातील अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील.देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या एका कार्यकर्त्याला स्टेजवरून ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांनी दाखवलेली दादागिरी दिसत आहे.व्हायरल होत असलेला व्हिडिओ भाजपच्या एका कार्यक्रमातील आहे. कार्यक्रमात अमित शाह यांचे स्वागत करण्यासाठी नेते त्यांना भलामोठा हार घालत असून फोटोसाठी उभे राहताना दिसत आहे. पण काही कार्यकर्ते बाजूला उभे असताना अमित शाह यांनी त्यांना हाताने बाजूला ढकललं आहे.अमित शाहांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून कार्यकर्त्यांना बाजूला सारून ते हात वर करताना दिसत आहेत. तर या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा व्हिडिओ दीपक खत्री या ट्वीटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने