"सत्या-श्रावणीच पुढं काय?" चाहते नाराज! रितेश देणार उत्तर...

मुंबई: अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलियाच्या वेड या चित्रपटाने प्रेक्षकांना खरचं वेड केलयं. या चित्रपटात आपल्याला प्रेमाची खरी व्याख्या सांगण्याचा प्रयत्न या जोडीनं केला आणि तो चाहत्याच्या काळजाला भिडला.सत्या आणि श्रावणीच्या प्रेमानं सर्वांनाच भावुक केलं. या चित्रपटाच्या कथेसोबतच प्रेक्षकांना या चित्रपटातील गाण्यांनीही वेड केलं. चित्रपटाची क्रेझ तर तुम्हाला चित्रपटाच्या कमाईवरुन कळलंच असेल.रितेशच्या वेड नं जवळपास ५० कोंटीचा गल्ला कमावला आहे. अजूनही या चित्रपटाची रेकॉर्ड ब्रेक कमाई सुरुचं आहे.अशातच रितेशने वेडच्या यशानंतर प्रेक्षकांना एक सरप्राईज देण्याचं ठरवलं आहे. प्रेक्षकांना चित्रपट आवडला आणि त्यातल्या गाण्यानेही त्यांना भूरळ घातली मात्र तरीही रितेशचे चाहते त्याच्यावर नाराज आहेत. याची माहिती स्वत: रितेशनेच व्हिडिओ शेअर करत दिली.रितेशने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात त्याचा चित्रपटातील मित्र शुभंकर तावडे गप्पा मारत असतात. शुभंकर म्हणतो, ' वाह! सिनेमा तर हिट झाला ब्लॉकबस्टर.. पुढे काय झालं?' यावर रितेश म्हणतो, 'कशाचं?' शुभंकर म्हणतो, सत्या' आणि श्रावणीचं पुढे काय झालं?'

रितेश म्हणतो,'काय झालं..हॅपिली एव्हर आफ्टर. यावर शुभंकर सांगतो, 'लोकं पण ना वेडी आहेत. लोकं म्हणता आहेत पिक्चरमध्ये सत्या आणि श्रावणीचं असं काही रोमँटिक गाणंच नाही आहे. आता गाणं कर.' यावर रितेश म्हणतो, पिक्चर रिलिज झालाय आता काय गाणं कर...' मग शुभंकर त्याला पुन्हा म्हणतो की लोक म्हणताय गाणं कर...आता मात्र शुभंकरच्या बोलण्यावर रितेशही विचारात पडतो आणि सत्या आणि श्रावणीच्या प्रेम कहानीवर गाणं काढावं असं त्याला वाटतं. आता या जोडीचं एक रोमेंटिक गाणं चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. वेड चित्रपटातील अप्रतिम गाण्यांनतर आणखी एका गाण्याचा आंनद घेण्यासाठी उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने