अनुज- अनुपमाचं सुटलं भान! इंटिमेट सीन्सचा व्हिडिओ व्हायरल...ट्विटरवर चाहत्यांचा राडा

 मुंबई:  अनुपमा ही टेलिव्हिजन मालिका सध्या खूप चर्चेत आहे. टेलिव्हिजन दर्शकांच्या आवडत्या शोपैकी एक असलेल्या 'अनुपमा'ने सुरुवातीपासूनच टीआरपीच्या यादीत आपले स्थान सातत्याने राखले आहे. शोची मुख्य अभिनेत्री अनुपमा आणि अनुज यांच्यात प्रेमाचं नातं अजून बहरणार आहे.खरं तर गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत अनुपमा आणि अनुज यांच्यात बराच काळ वाद सुरू होता. तसेच कौटुंबिक वादावरून अनुपमा आणि अनुजमध्ये भांडण झाले होते. या सर्व गोष्टी विसरून पुढे जाण्यासाठी अनुपमाने अनुजला एक रोमँटिक सरप्राईज देण्याचा प्लॅन केला आहे. अनुपमा त्यांचे नाते पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी अनेक प्रयत्न करताना दिसते.निर्मात्यांनी 'अनुपमा' मधील अनुज आणि अनुपमाच्या पात्रातील एक इंटिमेट सीन दाखवण्याचा निर्णय घेतला आणि आता सोशल मीडियावर बरेच फोटो व्हायरल होत आहेत. वास्तविक या मालिकेत अनुपमा आणि अनुज यांच्यातील रोमान्स दाखवण्यात आला आहे.या मालिकेत त्यांच्यातील केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे. या प्रसंगाचा एक प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघेही एकमेकांसोबत रोमँटिक झालेले दिसत आहेत.आता अनुपमा आणि अनुज यांच्यातील इंटिमेट सीनचे अनेक फोटो ट्विटरवर खूप व्हायरल होत आहेत. काही चाहते अशा दृश्यावर आश्चर्य व्यक्त करत आहेत, तर बरेच लोक या इंटिमेट सीनबद्दल खूप आनंदी आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने