अनुराग कश्यपच्या मोदींवरील टिकेवर विवेक अग्नीहोत्री भडकले, म्हणाले..

मुंबई: विवेक अग्निहोत्री आणि अनुराग कश्याप यांच्यात ट्विटर वर पुन्हा एकदा शाब्दिक वार दिसून येतोय. झालं असं कि.. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे नेते आणि कार्यकर्त्यांना कोणत्याही सिनेमावर, दिग्दर्शकावर आणि फिल्ममेकर्स वर अनावश्यक कमेंट्स करू नका, असं सांगितलं आहे. यावर अनुराग कश्यप मोदींना उद्देशून म्हणाला. पुढे विवेक अग्नीहोत्रींनीं अनुरागच्या व्हिडिओवर कमेंट करत त्याच्यावर निशाणा साधला.मोदी म्हणाले होते,"कोणीही अनावश्यक टिप्पण्या करू नये ज्यामुळे आम्ही करत असलेल्या कठोर परिश्रम वाया जाईल". यावर अनुरागने एक व्हिडिओ बनवला आणि म्हणाला, "तुम्ही हे ४ वर्षांपूर्वी सांगितलं असतं तर काहीतरी फरक पडला असता. आता त्याचा काही उपयोग नाही. तुमचा जमाव आता नियंत्रणाबाहेर गेलाय."पुढे विवेक अग्निहोत्रींनी अनुरागला खोचक शब्दात सुनावले आहे. अनुरागचं स्टेटमेंट दाखवत अग्नीहोत्री म्हणाले,"व्वा व्वा व्वा! प्रेक्षक आता जमाव वाटत आहेत." त्यामुळे पुन्हा एकदा अनुराग कश्यप आणि विवेक अग्नीहोत्री यांच्यात सोशल मीडियावर शाब्दिक चकमक रंगली.पठाण सिनेमातील बेशरम रंग गाण्यावरून चांगलाच वाद रंगला. बेशरम रंग मध्ये दीपिका पादुकोणने भगवी बिकिनी परिधान करून डान्स केला. त्यावरून मोठा वाद रंगला. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अशा अनावश्यक टिपणी करू नये म्हणून सूचना केल्या. 'पण तुम्हाला हे सांगायला उशीर झाला', असं अनुराग कश्यप त्यांना म्हणाला. मोदींना बोलल्यामुळे विवेक अग्नीहोत्री मात्र अनुराग कश्यपवर भडकले.वर्क फ्रंट बद्दल सांगायचं झालं तर.. अनुराग कश्यप क्रिती सॅनॉन सोबत आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर काश्मीर फाईल्स नंतर विवेक अग्निहोत्री द वॅक्सीन वॉर सिनेमाची जय्यत तयारी करत आहेत. सध्या हैद्राबादला सिनेमाचं शूटिंग सुरु आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने