'बिग बॉसमध्ये जाताना वरूण तू मला आश्वासन दिलं होतं..; अपूर्वाची पोस्ट अन् चर्चेला उधाण

मुंबई: 'बिग बॉस मराठी सिझन ४' मध्ये अपूर्वा नेमळेकर शो ची विजेती ठरली नसली तरी चर्चा मात्र तिचीच सर्वाधिक रंगली. ती जसं बिग बॉसच्या घरात जाताना म्हणाली होती तशीच ती १०० दिवस घरात वागली...जशी आहे तशी... अपूर्वा तिच्या 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील शेवंता या व्यक्तिरेखेमुळे चर्चेत होतीच, तिच्या चाहत्यांची संख्याही मोठीच होती, पण बिग बॉस नंतर त्याच्यात दुपटीनं वाढ झालीय असं म्हटलं तर नक्कीच अतिश्योक्ती होणार नाही.

अपूर्वा नेमळेकरची सध्या सोशल मीडियावर जोरदार हवा आहे. तिची प्रत्येक पोस्ट चर्चेत येताना दिसत आहे. मांजरेकरांच्या सिनेमात ती लवकरच दिसणार आहे या बातमीनं डोकं वर काढलं असताना यादरम्यान आता अपूर्वानं वरुणला लिहिलेल्या एका नोटनं लक्ष वेधलंय. कोण आहे हा वरुण? तुम्हालाही जाणून घेण्याची उत्सुकता लागली असेलच ना..चला तर मग जाणून घेऊया...अपूर्वानं वरुणच्या नावे नोट लिहिली आहे हे ऐकून अनेकांच्या भूवया उंचावल्या असतील. अपूर्वा नेमळेकरनं तिची ही नोट लिहिलिय सुप्रसिद्ध शेफ वरुण इनामदार याच्या नावे.तिनं लिहिलं आहे की, बिग बॉस च्या घरात आल्यावर वरूण तू मला एक गोष्टीचं आश्वासन दिलं होतं घराबाहेर आल्यावर मला तुझ्या हातची " पापलेट करी " खायला नक्की देशील आणि आज तू तुझा शब्द पूर्ण केला. जग प्रसिद्ध शेफ तर तू आहेस पण तू माझ्या साठी एवढ्या आपुलकीने ही टेस्टी पापलेट करी पाठवली आहेस म्हणून ही " Lady Of Words " खूश झाली आहे. Thank you @varuninamda

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने