अर्चना गौतमनं बिग बॉसलाच भरला दम! 'जर का माझ्या...'

मुंबई: टीव्ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय रियॅलिटी शो बिग बॉस हा आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचला आहे. गेल्या काही महिन्यांपासून बिग बॉसनं प्रेक्षकांचे, नेटकऱ्यांचे मनोरंजन केले आहे. त्यातून अनेक धक्कादायक खुलासे देखील समोर आले आहेत. आता तर या रियॅलिटी शोमधील अर्चना गौतमनं थेट बिग बॉसलाच दम भरला आहे.दिवसेंदिवस बिग बॉसच्या खेळातील रंगत वाढताना दिसत आहे. बारा दिवसांनंतर बिग बॉसचे यंदाचे पर्व निरोप घेणार आहे. त्यामुळे शोमधील आपले स्थान टिकवण्यासाठी स्पर्धकांची चढाओढ लागली आहे. त्यावरुन वेगवेगळे खुलासेही समोर आले आहेत. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी, चाहत्यांनी आपल्या आवडत्या स्पर्धकांना सपोर्ट करण्यास सुरुवात केली आहे.यासगळयात यंदाच्या बिग बॉसमधील सर्वाधिक वादग्रस्त स्पर्धक अर्चना गौतम ही चर्चेत आली आहे. गेल्या सीझनमध्ये ज्याप्रमाणे राखीनं आपल्या स्वभावानं बिग बॉसमध्ये रंग भरले होते. त्याचरीतिनं आता अर्चनानं सगळ्यांना सळो की पळो करुन सोडले आहे. यात तिनं तर बिग बॉसला देखील सोडलेलं नाही. त्यालाच धमकी देऊन स्वताच्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेण्याचे काम अर्चनानं केले आहे.बिग बॉसच्या शेवटच्या टप्प्यात स्पर्धक एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. अर्चना काही दिवस शांत होती. आता मात्र ती पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. तिनं निमृत कौरला चांगलेच सुनावले आहे. एका टास्कच्या दरम्यान तिचं आणि प्रियंकाचा वाद झाला. यावेळी बिग बॉसनं हस्तक्षेप केला. मात्र अर्चनानं बिग बॉसचे न ऐकता त्यालाच प्रत्युत्तर करण्यास सुरुवात केली.

अर्चनानं बिग बॉसवर जे आरोप केले ते ऐकून बिग बॉसही घाबरुन गेलं असून शेवटी त्याला देखील खुलासा करावा लागला आहे. अर्चनानं बिग बॉसच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. त्यावरुन बिग बॉसला आपली बाजू मांडावी लागली होती. अर्चना जे काही बोलली हे तिची प्रतिक्रिया आहे. त्याचा आम्ही आदर राखतो. अर्चनानं बिग बॉसमध्ये शांतता कशी राहिल याचा विचार करावा. असे म्हटले होते. जर का माझ्याविरोधात सातत्यानं बोललं जात असेल तर मी काहीच बोलायचे नाही का असा प्रश्न अर्चनानं यावेळी उपस्थित केला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने