एकीकडे नातीचं बारस तर दुसरीकडे आजीचं लग्न... अरुंधतीसमोर प्रश्न

मुंबई: छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. आता आशुतोष आणि अरुंधतीची प्रेमकहाणीही पुढे सरकत आहे. आशुतोष आणि अरुंधती यांनी एकमेकांवर प्रेम मान्य केलं आहे. आता प्रेक्षकांना त्याच्या लग्नाची प्रतिक्षा आहे.मात्र या सगळ्यात अनिरुद्ध हा काही शांत बसतांना दिसत नाही आहे. अरुंधतीचं लग्न होऊ न देण्यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. आता या मालिकेला नवीन वळण येण्याची शक्यता आहे.मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये देशमुखांच्या घरी अभि आणि अनघाच्या मुलीच्या बारस्याची तयारी पाहायला मिळत आहे. बारस्यासाठी देशमुख कुटुंबीय जय्यत तयारी करतांना दिसतयं.
या व्हिडिओत अनिरुद्ध कांचनसोबत बोलतांना दिसतोय. तो म्हणतो, 'इथे तुम्ही बारशाची तयारी करताय, पण तिकडे लग्नाची तयारी सुरु आहे.' त्यावर कांचन म्हणते, 'आता कोणाचं लग्न?' अरुंधती आणि आशुतोषचं असं अनिरुद्ध म्हणतो. ते ऐकून कांचनला धक्काच बसतो.तर दुसरीकडे अरुंधतीही तिच्या घरी आशुतोषबद्दल सांगतेय. अरुंधती अप्पांना सांगते, 'काही महिन्यांपूर्वी आशुतोषने मला लग्नाची मागणी घातली होती आणि मी आप्पा मी आशुतोषशी लग्नाचा विचार करतेय, मी आशुतोषला होकार कळवला आहे.' तिचं बोलणं ऐकल्यानंतर आप्पांच्याही चेहऱ्यांचा रंगच बदलतो.अखेर अरुंधतीने स्वत: साठी निर्णय घेतला आणि तो स्पष्टपणे आप्पांना सांगितला आता ती बाकिच्या सदस्यांना तिचा निर्णय कधी सांगते. त्यावर घरातल्यांची आणि विशेषमध्ये कांचन आणि अभीची काय प्रतिक्रिया असेल आणि अनिरुद्ध पुढे काय करणार, याकडे प्रेक्षकांच लक्ष लागून राहिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने