'तुला कसला रे एवढा अ‍ॅटिट्युड!' शाहरुखच्या लेकावर का भडकले फोटोग्राफर्स?

मुंबई: बॉलीवूडचा किंग खान शाहरुख त्याच्या हटकेपणासाठी नेहमीच चर्चेत असतो. सध्या तो त्याच्या पठाण चित्रपटासाठी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पुढील आठवड्यात त्याचा पठाण प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. यासगळ्यात त्याचा लाडका लेक आर्यन खान ट्रोल झाला आहे.त्याचं झालं असं की, अख्ख बॉलीवूड भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या मुलाच्या अनंत आणि राधिकाच्या मर्चंटच्या साखरपुड्याला हजर होते. त्यामध्ये रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, शाहरुख खान, सलमान खान, विकी कौशल, कतरिना, करिना यासगळ्यात लक्ष वेधून घेतले होते ते आर्यन खानने. शाहरुखची पत्नी गौरी खान आणि आर्यननं त्या सोहळ्यामध्ये इंट्री केली आणि चर्चेला सुरुवात झाली.देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाचा साखरपुडा म्हटल्यावर चर्चा तर होणारच. अशावेळी बॉलीवूडमधील सेलिब्रेटींच्या उपस्थितीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी मोठया प्रमाणावर प्रतिक्रिया आल्या आहेत. मात्र त्यात आर्यन आणि गौरी खानचे फोटो घेताना फोटोग्राफर्स नाराज झाल्याचे दिसून आले आहे. यासगळ्यात पापराझ्झींनी आर्यन खानला चांगलेच सुनावले आहे.त्या पार्टीमध्ये फोटोग्राफर्सनं देखील मोठी गर्दी केली होती. बॉलीवूडच्या सेलिब्रेटींचे फोटो घेण्यासाठी त्यांची लगबग सुरु होती. अशावेळी आर्यन खानची शाहरुख, गौरीसोबत इंट्री झाली. तेव्हा फोटोग्राफर्सनं त्यांचे फोटो घेण्यास सुरुवात केली तेव्हा एकीकडे गौरी हसून फोटोसाठी पोझ देत होती. दुसरीकडे आर्यनच्या तोंडावर बारा वाजले होते.त्याचे हावभाव पाहून नेटकऱ्यांनी आणि फोटोग्राफर्सनं त्याला ट्रोल केले होते. आर्यनला काय झाले, त्याला एवढा कसला अॅटिट्युट अशा शब्दांत नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अंबानींच्या त्या शानदार सोहळ्यामध्ये बरेच सेलिब्रेटी ट्रोल झाल्याचे दिसून आले आहे. रणवीर आणि दीपिकालाही नेटकऱ्यांनी बरेच प्रश्न विचारले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने