के एल राहुल आणि अथियाचा लग्नसोहळा होणार आजपासून सुरू, जाणून घ्या कसे असतील कार्यक्रम

मुंबई: भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज के एल राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तो त्याची गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत लग्नगाठ बांधणार आहे. आजपासून (21 जानेवारी) हा विवाह सोहळा सुरू झाला आहे. या तीन दिवसीय सोहळ्यात कॉकटेल पार्टी, मेहंदी आणि हळदीसह अनेक कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत.के एल राहुल आणि अथिया 23 जानेवारीला लग्न करणार असल्याची बातमी समोर आली आहे. हे लग्न अगदी जवळच्या नातेवाईक आणि मित्रांमध्येच होणार आहे. अथियाचे वडील बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते सुनील शेट्टी आहेत. अथिया आणि के एल राहुलच्या कुटुंबीयांकडून लग्नाची सर्व तयारी करण्यात आली आहे.राहुल-अथियाचा विवाह सोहळा तीन दिवस चालणार आहे.हा विवाह सोहळा गुप्त ठेवण्यात आला आहे. सुनील शेट्टीच्या खंडाळा बंगल्यात हे लग्न होणार आहे. शनिवारपासून विवाहपूर्व कार्यक्रम सुरू होणार आहेत. या दिवशी संध्याकाळी कॉकटेल पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.रविवारी (२२ जानेवारी) मेंहदी आणि हळदीचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. या दरम्यान कुटुंबातील फक्त जवळचे नातेवाईक सहभागी होणार आहेत. त्यानंतर सोमवार (२३ जानेवारी) हा दिवस केएल राहुल आणि अथियासाठी खूप खास असणार आहे. या दिवशी दोघेही लग्नगाठ बांधणार आहेत.लग्नानंतर मुंबई-बेंगळुरूमध्ये दोन मोठे रिसेप्शन होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या लग्नानंतर सुनील शेट्टी आणि केएल राहुलचे कुटुंबांनी त्यांच्या उर्वरित मित्र आणि नातेवाईकांसाठी दोन मोठे रिसेप्शन आयोजित केले आहेत,यामध्ये क्रिकेट टीमचे स्टार खेळाडू, बॉलीवूड सेलिब्रिटी, उद्योगपती आणि राजकारणी यांना बोलावण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने