अवधूत गुप्तेची राजकारणात एन्ट्री? 'झेंडा'च्या सिक्वलबाबत मोठी घोषणा

मुंबई : प्रसिद्ध गायक, संगितकार, दिग्दर्शक, अभिनेता अवधूत गुप्ते राजकारणात पाऊल टाकणार आहे. एका मुलाखतीत त्यानं ही माहिती दिली. अवधूत आपल्या प्रोफेशनद्वारे राजकीय क्षेत्राच्या कायम जवळ राहिला आहे. त्याला राजकारणात येण्याबाबत विविध राजकीय पक्षांकडून अनेकदा विचारणाही झाली आहे. यापार्श्वभूमीवर आपल्या प्रत्यक्ष राजकारणातील प्रवेशावर तो स्पष्टच बोलला आहे.अवधूत गुप्ते मराठीसह बॉलिवूडमध्येही पार्श्वगायक म्हणून प्रसिद्ध आहे. त्यानं मराठीत झेंडा हा महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य करणारा एक सिनेमाची दिग्दर्शित केला होता. या सिनेमाला मोठा प्रतिसाद लाभला होता. त्याचबरोबर विविध राजकीय पक्षांसाठी त्यानं थीमसाँग बनवले आहेत. त्यामुळं आपल्या कामामधून तो कायम राजकारणाच्या जवळच राहिला आहे.दरम्यान, मुंबई टाईम्स कार्निव्हल या कार्यक्रमात अभिनेता पुष्कर श्रोत्री यानं अवधूत गुप्तेशी संवाद साधला. यावेळी अवधूतनं आपण राजकारणात येण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं आहे. राजकारणात येण्याची योग्य वेळ कुठली आहे हे देखील त्यांनं यावेळी सांगितलं. तो म्हणाला, "एखादी निवडणूक आली की मला अनेकदा राजकारणात येण्याबाबत विचारणा झाली आहे. पण आता मी खरंच जाहीर करुन टाकतो की मी राजकारणात प्रवेश करणार आहे. पण मी जेव्हा सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त होईल तेव्हाच राजकारणात प्रवेश करेन. ज्यावेळी माझा पक्का निर्णय होईल तेव्हा मी राजकारणात येण्याची तारीखही जाहीर करेन"यापूर्वी शिवसेनेच्या फुटीवर अवधूतनं दिग्दर्शित केलेला झेंडा सिनेमाचा पुढचा भाग येईल का? या प्रश्नावरही त्यानं उत्तर दिलं आहे. झेंडा सिनेमात मी शिवसेनेच्या सामान्य कार्यकर्त्याची बाजू मांडली होती. पण आता नेत्यांची आगतिकता दाखवेन, याच्या स्क्रिप्टवर माझं काम सुरु आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने