मी कोणी साधू-संत नाही, लवकरच लग्न करणार; बागेश्वर महाराजांचा मोठा खुलासा

छतरपूर:   बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री  सध्या प्रचंड चर्चेत आहेत. 'अंनिस' विरुद्ध धीरेंद्र शास्त्री असा वाद सुरु असतानाच बागेश्वर महाराज जया किशोरीशी  लग्न करणार आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगलीये.जया किशोरी या प्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर आहेत. याचदरम्यान आपण लवकरच लग्न करणार असल्याची  माहिती    बागेश्वर महाराज यांनी दिलीये. मात्र, कोणासोबत लग्न करणार हे त्यांनी अद्याप सांगितलेलं नाही.मठाधिपती धीरेंद्र शास्त्री गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. लोकांच्या मनात काय सुरु आहे, हे ते ओळखत असल्याचा दावा करतात. त्यामुळं त्यांच्या दरबारात देशभरातून अनेक जण येत असतात. मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम इथं सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्री धीरेंद्र शास्त्री म्हणजेच, बागेश्वर महाराज यांचा दरबार झाला. प्रदीर्घ कालावधीनंतर धामवर पोहोचलेल्या बागेश्वर महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.बागेश्वर महाराज हजारोंच्या गर्दीतून बाहेर आले आणि मध्यरात्री त्यांना भेटले. तसंच एका हिंदी वृत्तवाहिनीशी त्यांनी संवाद साधला. बागेश्वर धाममध्ये 121 गरीब मुलींचे सामूहिक विवाह होत आहेत. सामूहिक विवाहाचे हे चौथे वर्ष आहे. बागेश्वर महाराजांनी सांगितलं की, या सामूहिक विवाहात नवीन जोडप्यांना कार आणि बाईक वगळता घरातील सर्व सामान दिलं जाईल. 

म्हणजेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन, कुलर, सोफा आणि डबल बेड सादर केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी आपण लवकरच लग्न करणार असल्याचं जाहीर केलं आहे, त्यामुळं बागेश्वर महाराज कोणासोबत लग्न करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.ते पुढं म्हणाले, मी कोणी साधू-संत नाही, अगदी सामान्य माणूस आहे. आपल्या ऋषीमुनींच्या परंपरेतही अनेक महापुरुषांनी घराघरात जीवन व्यतीत केलं आहे. देवही गृहस्थांमध्येच दिसतो. म्हणजे आधी ब्रह्मचारी, मग गृहस्थ, वनप्रस्थ आणि नंतर संन्यासाची परंपरा आहे, त्यावर आपण पुढे जाऊ. आम्हीही लवकरच लग्न करणार आहोत. परंतु, अधिक लोकांना आमंत्रित करू शकत नाही, अशी माहिती बागेश्वर महाराजांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने