5 संघांसाठी बीसीसीआयला मिळाले फ्रेंचायजी; कमावला 4669.99 कोटींचा गल्ला

मुंबई: महिला आयपीएलसाठी बीसीसीआयला 5 संघांसाठी फ्रेंचायजी मिळाले आहेत. बीसीसीआयने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार संघांच्या लिलावातून बीसीसीआयला 4 हजार 669 कोटी रूपयांची कमाई झाली आहे. पुरूषांच्या आयपीएलमधील अनेक संघांनी महिला आयपीएलमधील देखील संघ खरेदी करण्यासाठी उत्सुकता दाखवली होती. मात्र यातील अनेकांनी ऐनवेळी माघार घेतली.बीसीसीआयने जाहीर केलेल्या यादीनुसार महिला आयपीएलसाठी अहमदाबाद, मुंबई, बंगळुरू, दिल्ली आणि लखनौ या शहरांची निवड करण्यात आली होती. अहमदाबादचा संघ अदानी स्पोर्ट्सलाईन प्रायव्हेट लिमिटेड यांनी तब्बल 1289 कोटी रूपयांना खरेदी केला. तर मुंबईचा संघ इंडिया विन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 912.99 कोटी रूपयांना खरेदी केली.रॉयल चॅलेंजर बेंगलोरने पुरूषांप्रमाणे महिला आयपीएलमध्ये बंगळुरूचा संघ खरेदी केला. त्यासाठी त्यांनी 901 कोटी रूपये खर्च केले. यानंतर दिल्लीचा संघ देखील JSW GMR ने 810 कोटी रूपये खर्चून आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवले. लखनौचा संघ काप्री ग्लोबल होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडने 757 कोटी रूपयांना खरेदी केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने