पोरगं डॅडी म्हणतय, पण आई काय म्हणना.. लेकासाठी भारतीचा जीव कासावीस..

मुंबई:  टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये आपल्या प्रभावी सादरीकरणामुळे भारती सिंग ही नेहमीच चर्चेत राहिली आहे. तिनं वेगवेगळ्या कॉमेडी शो मधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या भारती ही तिचा मुलगा गोलू उर्फ लक्ष्यमुळे चर्चेत असते.तिचा मुलगा आता सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाला आहे. त्याच्या व्हिडिओही नेटकऱ्यांना प्रचंड आवडत असतात. आज असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये भारती आपल्या बाळाकडून 'आई' हा एक शब्द आईकण्यासाठी आसुसली आहे.असे असतानाही तो केवळ 'बाबा-बाबा' म्हणत असल्याने भारतीच्या जिवाची होणारी उलघाल ही या व्हिडिओ मध्ये दिसत आहे.भारतीने एक व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये ती म्हणते, ''माझी अशी इच्छा आहे माझ्या मुलाने फक्त आई आई बोलावं.. ''बाबा'' तो सहा सात वर्षांनी बोलला तरी चालेल. पण वास्तवात मात्र दूसरा एक व्हिडिओ आहे.. ज्यामध्ये भारती त्याला 'आई' बोलण्यासाठी प्रवृत्त करत आहे. पण तिचं बाळ आई म्हणून हाक मारायला काही तयार नाही. ते 'बाबा-बाबा' म्हणूनच आवाज देत आहे. हा अत्यंत गमतीशीर व्हिडिओ भारतीने शेयर केला आहे, जो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने