'हार के जीतने वाले को सिकंदर कहते है', पंजाब केसरी भूपेंद्रसिंहला दाखवलं आस्मान

मुंबई:  यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकणाऱ्यापेक्षा पराभूत झालेल्या सिंकदरमुळे चर्चेत राहिली. पण 'हार के जीतने वाले को सिकंदर कहते है'. हरियाणाच्या भुपेंद्र अजानाळा चितपटकरून सिकंदर भीमा केसरीचा मानकरी ठरला आहे.गेल्या काही दिवसांपासून सिकंदर सोशल मीडियावर चर्चेत आहे. केसरी स्पर्धेत अन्याय झाल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम कुस्तीप्रेमी नाराज झाले होते.पण सिकंदर शेखने त्यांची नाराजी आता दूर केली आहे. पंढरपूरमध्ये धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त भरविलेल्या भीमा केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत सिकंदर शेखने बाजी मारली.हरियाणाच्या भुपेंद्र अजानाळा चितपटकरून सिकंदर भीमा केसरीचा मानकरी ठरला आहे. महाराष्ट्र केसरी उपांत्य फेरीत पराभूत झाल्यामुळे सिकंदरवर अन्याय झाल्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. पण भीमा केसरीच्या मैदानात उतरुन सिकंदरने 'हार के जीतने वाले को सिकंदर कहते है' हे बोल खरं करुन दाखवले.

गेल्या आठवड्यात सिकंदर 'विसापूर केसरी' चा मानकरी

गेल्या आठवड्यातट सिंकदरने सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील 'विसापूर केसरी'चे मैदान मारलं होतं. त्यावेळी सिकंदर शेखने मोळी डावावर पंजाबचा पैलवान नवजीत सिंगला लोळवले होते.अवघ्या पाचच मिनिटात सिकंदरने कुस्ती करत कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे पारणे फेडले. या विसापूर केसरीसाठी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून मल्ल आले होते. त्यामुळं या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने