अजय देवगच्या चित्रपटात नेहमी तब्बूच पोलीस का?

मुंबई :  'दृश्यम 2' च्या प्रचंड यशानंतर अजय देवगणचे चाहते त्याचा पुढचा चित्रपट 'भोला'च्या रिलीजची वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अजून बराच अवधी आहे. या सिनेमात पुन्हा एकदा अजय देवगण आणि तब्बूचा अप्रतिम अभिनय पाहायला मिळणार आहे. 'भोला' चित्रपटातील अजय देवगणचा फर्स्ट लूक मेकर्सने आधीच रिलीज केला होता. आता तब्बूच्या पात्राची पहिली झलकही समोर आली आहे.अजय देवगण 'भोला'चे दिग्दर्शन आणि निर्मिती करत आहे. तब्बूसोबतचा हा त्याचा 9वा चित्रपट असेल. निर्मात्यांनी चित्रपटातील तब्बूचा फर्स्ट लुक रिलीज केला आहे, ज्यामध्ये ती एका दबंग पोलीस अधिकाऱ्याच्या लूकमध्ये दिसत आहे. अजय देवगणने तब्बूचा लूक शेअर करत व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या व्हॉईस ओव्हरमध्ये तब्बू म्हणते, 'आज रात या तो वो हमें ढूंढ लेगा या हम उसे, गोली तो खानी पड़ेगी'.अजय देवगण आणि तब्बू यांच्या कारकिर्दीतील पुढचा ब्लॉकबस्टर चित्रपट म्हणून चाहत्यांनी 'भोला'चे वर्णन केले आहे. एका यूजरने कमेंट केली की, 'तब्बू जी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाल करायला तयार आहे.' दुसर्‍याने त्याचे वर्णन 'ब्लॉकबस्टर लोडिंग' चित्रपट म्हणून केले.अजय देवगण दिग्दर्शित हा चित्रपट 2019 च्या तमिळ ब्लॉकबस्टर 'कैथी' चा हिंदी रिमेक आहे. कैथीचे दिग्दर्शन लोकेश कनागराज यांनी केले होते. आता अजय देवगण हीच कथा हिंदी भाषेत प्रेक्षकांना दाखवणार आहे. 50 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट 30 मार्च 2023 रोजी 3D मध्ये प्रदर्शित होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने