मानल पठ्ठ्याला ! युट्युबच्या कमाईवर घेतली ५० लाखांची ऑडी, दर महिन्याला...

 नवी दिल्ली : कोणत्याही उदयोन्मुख कलावंतांना यूट्यूबमुळे मोठं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. तरुणांसाठी यशस्वी होण्याचे मार्ग खुले आहेत. युट्यूब प्लॅटफॉर्मसाठी व्हिडिओ बनविणे स्कीलफुल आणि पूर्णवेळ काम आहे. त्यासाठी केवळ फोन कॅमेरा आणि यशस्वी होण्याची तीव्र इच्छाशक्ती आवश्यक आहे. युट्युबमुळे अनेकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाले आहेत. बिहारच्या एका तरुणाने तर ५० लाखांची ऑडी कार विकत घेतली आहे.बिहारचा हर्ष राजपूत जो युट्यूबवर विविध विषयांवर रिपोर्टिंग करून विनोदी व्हिडिओ बनवतो. त्याच्या चॅनेलवर त्याचे जवळपास ३३ लाख सबस्क्रायबर्स आहेत. यूट्यूबच्या कमाईतून त्याने आता ५० लाख रुपयांची ऑडी कार खरेदी केली आहे. 10 मिनिटांचा कॉमेडी असलेला त्याचा सर्वात लोकप्रिय व्हिडिओ 20 दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे.हर्षच्या स्क्रिप्टेड व्हिडिओंमध्ये असा अभिनय असतो की लोकांना घटनेच्या वास्तवापासून दुर नेलं जातं. तो औरंगाबादच्या बिहारमधील जसोईया गावचा रहिवासी आहे. युट्युब अ ॅडसेन्समधून हर्ष दरमहा ८ लाख रुपयांपर्यंत कमाई करतो. याबाबत त्याने माहिती दिली.नियमित युट्युबचे उत्पन्न बाजूला ठेवून ब्रँड प्रमोशनमधूनही त्याला नफा मिळतो. हर्षने जून २०२२ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत अॅडसेन्समधून दरमहा सरासरी साडेचार लाख रुपये कमावले.हर्षचे वडील बिहार पोलिसात होमगार्ड आणि पोलिस अधिकाऱ्यांसाठी ड्रायव्हर म्हणून काम करत होते. तर हर्ष स्वत:ला अभिनेता सांगतो. मुंबईला जाण्यापूर्वी हर्षने दिल्लीत नाटकातही काम केले. मात्र, जेव्हा कोविडमुळे त्याला घरी परतावे लागले. लॉकडाऊनच्या काळात त्याने आपलं यूट्यूब चॅनेल सुरू केलं. त्याच्या व्हिडिओमध्ये तो रिपोर्टरची भूमिका साकारतो आणि चालू घडामोडींवर आधारित कॉमेडी करतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने