'आता कंटाळा आला..', पार्टीत ऐश्वर्याला पाहून लोक असं का म्हणू लागले?

मुंबई: सुभाष घई यांच्या ७८ व्या बर्थ डे निमित्तानं जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत बॉलीवूडच्या दिग्ग्जांनी हजेरी लावली होती. पार्टीत सलमान खान व्यतिरिक्त ऐश्वर्या राय बच्चन आपला पती अभिषेक बच्चन सोबत सामिल झाली होती. यांचा पार्टीतला व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायर होताना दिसत आहे. ऐश्वर्यानं निळ्या रंगाचा सूट घातला होता. हा रंग ऐश्वर्याच्या अंगावर खूपच खुलून दिसत होता.ऐश्वर्यानं पार्टीत अभिषेकसोबत एन्ट्री मारली अन् सोशल मीडियावर लोक तिला जबरदस्त ट्रोल करु लागले आहेत. आता लोक काय बोलू लागलेयत हे जाणून घेऊया. या व्यतिरिक्त ऐश्वर्या राय बच्चनच्या सासूबाई जया बच्चन या पार्टीत पोहचल्या होत्या, त्यांना गाडीपर्यंत ड्रॉप करायला उत्सवमूर्ती सुभाष घई स्वतः आलेले दिसले.सुभाष घई यांच्या बर्थ डे पार्टीत ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन पार्टीत सामिल झाले होते. ऐश्वर्या आणि अभिषेकचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर लोक आता ऐश्वर्या रायला तिच्या हेअर स्टाइलवरनं ट्रोल करताना दिसत आहेत.एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, 'प्रत्येकवेळी ऐश्वर्याला एकाच हेअर स्टाइलमध्ये पाहून कंटाळा आला'. आणखी एकानं लिहिलं आहे-'ऐश्वर्याची पर्मनंट हेअर स्टाइल'. तर एकानं लिहिलं आहे की-'अगं हेअर स्टाइल बदलत नाहीस तर किमान ड्रेसिंग पॅटर्न तरी बदल'. काही लोकांनी तर ऐश्वर्या-अभिषेकच्या केमिस्ट्रीलाच 'फेक' म्हटलं आहे.

जया बच्चन देखील सुभाष घई यांच्या पार्टीत सामिल झाल्या होत्या. जया यांचा व्हिडीओ समोर आला त्यात सुभाष घई स्वतः त्यांना खूप स्पेशल ट्रीट देताना दिसले. जया बच्चन यांना त्यांच्या कारपर्यंत सोडायला खुद्द सुभाष घई आलेले दिसले.जया यांच्या या व्हिडीओवर लोकांनी अनेक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. लोक म्हणतायत,'त्यांच्या जवळपास जी लोकं आहेत त्यांनी काळजी घ्या..बाईंना कधी राग येईल सांगता यायचं नाही'. एकानं लिहिलं आहे की-'तुम्ही सगळे मिळून यांना बॉयकॉट का करत नाही?'जया बच्चन यांचे असे अनेक व्हिडीओ याआधी समोर आले ज्यात त्या पापाराझीवर भडकताना दिसल्या. नुकत्याच एका व्हायरल व्हिडीओत त्या अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसल्या होत्या. यादरम्यान एक अनोळखी माणूस त्यांचे फोटो घेत होता,आणि कॅमेऱ्यात जया बच्चन यांना कॅप्चर केलेलं दिसत होतं.त्यावेळी जया बच्चन म्हणताना दिसल्या होत्या-'माझा फोटो नका काढू..तुम्हाला इंग्रजी भाषा कळत नाही का?' यादरम्यान सुरक्षा रक्षक लोकांना बाजूला हटवताना दिसले होते आणि व्हिडीओत जया बच्चन म्हणताना दिसल्या होत्या-'अशा लोकांना नोकरीवरनं काढलं पाहिजे..'

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने