''बॉलीवूडमध्ये आपला 'उत्तराधिकारी' कोण?'', शाहरुख अन् सलमाननं कोणाचं नाव केलं फायनल?

मुंबई: अनेक वर्षानंतर शाहरुख खान आणि सलमान खान एकत्र मोठ्या पडद्यावर 'पठाण' सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना दिसत आहेत. सलमान काही मिनिटांसाठीच 'पठाण' मध्ये दिसला ..पण एकदम सॉल्लिड एन्ट्री झालीय दबंग खानची.प्रत्येकाच्या मुखात सलमान आणि शाहरुखचीच चर्चा रंगली आहे. 'पठाण' रिलीज झाल्यानंतर आता या दोन सुपरस्टार्सची सिनेमातील एक व्हिडीओ क्लीप व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात दोघंही चर्चा करताना दिसत आहेत की आता त्यांना खूप वर्ष झाली हे काम करुन आता ही जागा कोणा दुसऱ्याला दयायला हवी.व्हिडीओमध्ये शाहरुख खान आणि सलमान खानमध्ये रॉ(RAW) सोडून द्यायची चर्चा सुरू आहे,पण त्यांनी ज्या पद्धतीच्या खाणाखुणा एकमेकांना पाहून केल्या आहेत..त्यावरनं मात्र भलतीच चर्चा रंगली आहे.लोकांचे म्हणणे पडतेय की दोघांचा इशारा बॉलीवूडमध्ये त्यांची जागा कोण घेणार याकडे आहे. सलमान आणि शाहरुख दोघेही शेवटपर्यंत कोणत्या नावावर एकमत होताना व्हिडीओत दिसत नाहीत.जबरी फाइट सीननंतर मालगाडीच्या डब्ब्यावर बसून शाहरुख सलमानला म्हणतो की,''मी कधी कधी विचार करतो..३० वर्ष झाली..आता सोडून द्यायला हवं'' . यावर सलमान म्हणतो,''पण आपली जागा कोण घेणार?''. यावर शाहरुख विचार करत म्हणतो की,''अरे तो आहे नं...'', सलमान नकारात्मक मान हलवतो तर त्यानंतर शाहरुखही त्या नावावर फुल्ली मारतो.मग सलमान खान म्हणताना दिसतो की, ''तो दुसरा आहे ना एक,त्याच्यात दम आहे''. पण शाहरुख त्यावर नकारार्थी मान हवलतो आणि म्हणतो,''नाही यार...तो नाही..त्याच्यात खास काय आहे असं''. यानंतर दोघंही एकाच नावावर विचार सुरु करतात पण तितक्यात एकमेकांकडे पाहून त्या नावावरही फुल्ली मारुन मोकळे होतात.मग जेव्हा दोघांनाही कोणतंच नाव सुचत नाही तेव्हा शाहरुख म्हणतो,''आपल्यालाच करावं लागेल भावा..देशाचा प्रश्न आहे शेवटी,मुलांवर नाही सोडू शकत सगळं..चल निघूया..''

शाहरुख आणि सलमान खानला फिल्म इंडस्ट्रीत आता ३० वर्षांहून अधिक काळ झाला आहे. यादरम्यान दोन्ही स्टार्स इंडस्ट्रीच्या टॉपच्या अभिनेत्यांच्या लिस्टमध्ये नाव कमावून आहेत. सलमान आणि शाहरुखसाठी चाहत्यांचा वेडेपणा कमालीचा जास्त आहे. त्यामुळे या दोघांची जागा इंडस्ट्रीत कोण घेणार हा प्रश्न खूपच मोठा आहे.सध्या बॉलीवूडमध्ये अनेक नवोदीत अभिनेते आहेत..ज्यांच्यात सुपरस्टार बनण्याची क्षमता आहे. यात रणबीर कपूर,शाहिद कपूर,रणवीर सिंग,कार्तिक आर्यन,वरुण धवन,विक्की कौशल,सिद्धार्थ मल्होत्रा,राजकुमार राव,टायगर श्रॉफ अशी मोठी लिस्ट आहे.यांच्यापैकी अनेकांना इंडस्ट्रीत १५ वर्षांहून अधिक वर्ष झाली आहेत. तर कार्तिक,वरुण,विक्की या कलाकारांनी कमी वेळात इंडस्ट्रीत आपलं नाव कमावलं आहे.शाहरुख आणि सलमान खान कोणाला आपला उत्तराधिकारी बनताना पाहतायत? इंडस्ट्रीमध्ये आता मुरलेले शाहिद,रणबीर की रणवीर सिंगला. की त्यांना वरुण,कार्तिक, विक्की सारख्या नवोदितांमध्ये बॉलीवूडचा पुढचा सुपरस्टार त्यांना दिसत आहे.अर्थात सिनेमात तर त्यांनी स्पष्ट केलं आहे की आपल्यालाच करावं लागेल..शेवटी देशाचा प्रश्न आहे. आता हा निर्णय प्रेक्षकांवरच सोडला तर अधिक उत्तम. शाहरुख आणि सलमानची जागा इंडस्ट्रीत कोण घेऊ शकतं..तुम्हाला काय वाटतं?

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने