'एका अयशस्वी पुरुषामागे...', महिलांविषयी हे काय बोलून गेली प्रीती झिंटा?

मुंबई: प्रीती झिंटा आता बॉलीवूडमध्ये फारशी सक्रिय नसली तरी अधनं-मधनं सोशल मीडियावर ती आपल्या जुळ्या मुलांचे फोटो शेअर करताना दिसते तर कधी इतरही तिच्या खास पोस्ट चाहत्यांसाठी आकर्षणाचा भाग ठरतात.सध्या इन्स्टावर तिचा एक इन्स्पिरेशनल व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यातील तिचे विचार अनेकांना पटले आहे तर अनेकांना खटकले आहेत. चला जाणून घेऊया नेमकं व्हिडीओत काय म्हणताना दिसत आहे प्रीती झिंटा?प्रीती झिंटाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,ती एका कार्यक्रमात संवाद साधताना दिसत आहे. ज्यात ती म्हणतेय की, ''एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते तर एका अयशस्वी पुरुषामागे दोन स्त्रिया असतात...'',ती हे वाक्य म्हणते नं म्हणते तोच उपस्थित पुरुषवर्गातनं जोरात हशा पिकलेला ऐकू येत आहे...प्रीती पुढे म्हणते, ''एका यशस्वी स्त्रीमागे मात्र एक प्रगतीशील पुरुष असतो...मग ते तिचे वडील,भाऊ किंवा नवरा यापैकी कुणीही असू शकतं''.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने