"राजकारणापासून दूर राहा नाहीतर..." ; कंगना पुन्हा सुरु, बॉलिवूडला दिली थेट धमकी!

मुंबई: चित्रपटांपेक्षा राजकारणात चर्चेत असलेले नाव म्हणजे कंगना रणौत. कंगनाने दीड वर्षानंतर ट्विटरवर पुनरागमन केले. कंगनाने बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा चित्रपट पठाण व त्याच्या चाहत्यांवर टीका केली आहे. आज सकाळी पठाण चित्रपटाला लक्ष्य करत कंगनाने हिंदू धर्माचा नारा दिला आहे. यासोबतच बॉलिवूडला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. शाहरुख खानच्या 'पठाण' २५ जानेवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत अनेक विक्रम मोडले आहेत. शाहरुखचे चाहते देखील आनंद साजरा करत आहेत. मात्र या चित्रपटाच्या निमित्ताने कंगनाने बॉलिवूडला टार्गेट केले आहे.

कंगनाने ट्विटरच्या माध्यमातून चांगली कामगिरी करणाऱ्या 'पठाण'च्या चाहत्यांना पुन्हा एकदा फटकारले आहे आणि 'राजकारण'पासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. कंगनाचे हे ट्विट धमकीसोबतच सल्लाही म्हणता येईल. 'पठाण'च्या यशानंतर बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत आनंद व्यक्त करत आहेत. यासोबतच करण जोहर आणि आलिया भट्ट सारखे इंडस्ट्रीतील कलाकार आणि दिग्दर्शक या चित्रपटाच्या यशाला 'द्वेषावरचा विजय' म्हणत आहेत.मात्र कंगनाला हे फारसे पटले नाही. कंगनाने बॉलिवूड आणि इंडस्ट्रीतील लोकांना इशारा दिला आहे. 'तुमच्या यशाचा आनंद घ्या' आणि 'राजकारणापासून दूर राहा' असे ट्विट कंगनाने केले .कंगनाने ट्विट करून लिहिले की, "बॉलिवूडवाल्यांनो, तुम्ही या देशातील हिंदूंच्या द्वेषाने त्रस्त आहात, अशी कथा निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, जर मी 'द्वेषावर विजय' हे शब्द पुन्हा ऐकले, तर मी तुमचा आधी जसा क्लास घेत होती तसा क्लास पुन्हा घेईन. तुम्ही तुमच्या यशाचा आनंद घ्या आणि चांगले काम करा, राजकारणापासून दूर राहा."

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने