जबरी कमाई! 'पठाण'नं तीन दिवसात जगभरातून कमावले 300 कोटी.. आणि भारतात..

मुंबई: शाहरुख खानचा 'पठाण' सिनेमा बॉक्स ऑफिस वर चांगलाच जलवा दाखवत आहे. पहिल्याच दिवशी पठाणने रेकॉर्ड ब्रेक कमाई करत 100 कोटींचा आकडा पार केला.त्यानंतर दुसऱ्या दिवशी थोडीशी उतरण पाहायला मिळाली. पण तिसऱ्या दिवसाअखेरी एक मोठी बातमी समोर आली आहे. शाहरुखच्या पठाणने जगभरातून तीन दिवसात 300 कोटींची कमाई केली आहे.शाहरुखचा चाहतावर्ग जगभरात असल्याने भारतासह अनेक देशांत हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर पाहिला जात आहे. त्यामुळे या चित्रपट भारता इतकाच किंबहुना त्यापेक्षा जास्त जगभरात गाजत आहे.

अॅडव्हान्स बुकिंगमध्ये जादू दाखवलेल्या या सिनेमाने रिलीजच्या तीन दिवसांत जगभरातील अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकलं आहे. आतापर्यंत या सिनेमाने एकूण 300 कोटींची कमाई केली आहे.'पठाण' 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला, भारतातही या चित्रपटाने मोठी कमाई केली आहे. भारतात पहिल्या दिवशी 'पठाण'ने 55 कोटींची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी 68 कोटींची कमाई केली. नंतर हा कल जरा मावळता दिसत आहे.कारण तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने भारतात 35 कोटींची कमाई केली. 3 दिवसात या चित्रपटाने भारतात एकूण 158 कोटींचा गल्ला जमवला. सुरवातीला 'पठाण' हा सिनेमा चांगलाच वादात अडकला होता. त्यातील 'बेशरम रंग' या गाण्यातील भगव्या रंगाची बिकिनी घातली होती. त्यावरून या चित्रपटाला बराच विरोध झाला. अगदी चित्रपट बंद पाडण्याची मागणीही झाली.त्यामुळे हा चित्रपट चालेल की नाही यात शंका होती. पण तीन दिवसात छप्पर तोड कमाई करून या चित्रपटाने विरोध करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने