कसा लागला ‘ब्रेल’ लिपीचा शोध, कोण होते लुईस ब्रेल जाणून घ्या

मुंबई: शिक्षणाचा अधिकार सगळ्यांनाच आहे. पण जर डोळेच नसतील तर लेखन, वाचन कसं करणार? असा प्रश्न आता कोणाला पडत नाही. कारण खास अंध लोकांना वाचता यावं यासाठी ब्रेल लिपी आहे. पण तुम्हाला या लिपी मागची कहाणी माहिती आहे का? जाणून घ्या.महान फ्रेंच शिक्षणतज्ज्ञ लुईस ब्रेल यांचा जन्म 4 जानेवारी, 1809 ला झाला होता. त्यांनी एक विशिष्ट लिपी शोधली, जी पुढे अंध व्यक्तींसाठी शिक्षणाचा स्रोत बनली. त्यांच्या नावावर हे या लिपीला ‘ब्रेल लिपी’ असे नाव देण्यात आले. त्यांच्या स्मृतींन उजाळा देण्यासाठी 4 जानेवारी हा दिवस ‘जागतिक ब्रेल दिन’ म्हणून साजरा केला जातो.

जन्मापासून नव्हते अंध

वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत नवउत्सुकतेनं जगाकडे बघणाऱ्या या चिमुकल्यावर अचानक दुःख कोसळलं. लुईस ब्रेल केवळ 3 वर्षांचे होते. ते वडिलांच्या दुकानात खेळत होते. त्याच्या वडिलांच्या दुकानात घोडेस्वारीशी संबंधित वस्तू बनवल्या जात होत्या. दुकानात, लाकडी सॅडल्स आणि घोड्यांसाठी जीन बनवले जात होते.लुईस ब्रेलसाठी खेळणी खरेदी करावी, इतके सधन त्यांचे कुटुंब नव्हते. यामुळेच लुईस ब्रेल आपल्या वडिलांच्या दुकानातील वस्तुंनीच खेळ खेळायचे. दुकानत घोड्यांसाठी बनवलेल्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी खेळणी समान होत्या. एक दिवशी असेच दुकानात खेळत असताना एका तीक्ष्ण वस्तूने अचानक लुईस ब्रेल यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली.महागडे उपचार करण्याची आर्थिक परिस्थिती नसल्याने घरीच उपचार केले. परिणामी ही जखम गंभीर होत गेली आणि कालांतराने दुसऱ्या डोळ्यालाही संसर्ग झाल्यामुळे लुईस ब्रेलचे यांचे दोन्ही डोळे कायमचे निकामी झाले.धैर्य गमावलं नाही

ब्रेल यांना ही दुखापत वयाच्या तिसऱ्या वर्षी झाली, पण वयाच्या 8व्या वर्षी लुईस ब्रेल यांना कायमचे अंधत्व आले. आयुष्यात हे सर्व चढ-उतार असूनही लुईस ब्रेल यांनी आपले धैर्य गमावले नाही आणि अभ्यास करून, पुढे काहीतरी मोठे काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

असे सुरू झाले प्रशिक्षण

लुईस ब्रेल यांची शिक्षणाकडे ओढ बघून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांना फ्रान्सचे प्रसिद्ध धर्मगुरू व्हॅलेंटाईन यांच्याकडे पुढील शिक्षणासाठी पाठवले. व्हॅलेंटाईन यांनी लुईसची प्रतिभा ओळखली आणि 1819मध्ये ‘रॉयल इन्स्टिट्यूट्स फॉर ब्लाइंड्स’ येथे त्यांना प्रवेश मिळवून दिला.

ब्रेल लिपीचा शोध

शिकताना अनेक अडचणीतून जावं लागतं हे लक्षात आल्यावर अधिक काहीतरी करण्याची उर्मी होती. वयाच्या 12व्या वर्षी त्यांना समजले की, रॉयल आर्मीच्या निवृत्त कॅप्टन चार्ल्स बार्बर यांनी सैन्यासाठी एक खास लिपी तयार केली आहे. ज्यात लाकडावर लिहिलेले शब्द चाचपडून वाचता येतील. कॅप्टनला भेटल्यानंतर चार्ल्स लुईस यांनी, बार्बर यांना तयार केलेल्या लिपीमध्ये काही बदल करण्याचा प्रस्ताव दिला.कॅप्टन बार्बर, लुईसचा प्रस्ताव ऐकून अवाक् झाले. परंतु, त्यांनी त्या सर्व सुधारणा केल्या. नंतर लुईस ब्रेलने या लिपीमध्ये अनेक आवश्यक बदल केले. आणि 1829मध्ये लुईस यांनी 6 बिंदूंवर आधारित आधारे ब्रेल लिपीचा शोध लावला. आज या लिपीत अनेक आवश्यक सुधारणा झाल्या आहेत. परंतु, तिचा पाया मात्र लुईस ब्रेल यांनी घातला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने