बिग बॉस १६ चा विजेता कोण होणार? शिव ठाकरेची बहिण म्हणाली, “त्याने मराठी बिग बॉस…”

मुंबई : बिग बॉसचा रिअॅलिटी शो कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. शिव ठाकरेने बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व जिंकले होते. या पर्वानंतर आता शिव हा बिग बॉस १६ मध्ये सहभागी झाला आहे. बिग बॉस हा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला आहे. या पर्वात कोण बाजी मारणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. नुकतंच शिव ठाकरेच्या बहिणीने ‘बिग बॉस १६ हा कार्यक्रम १०० टक्के माझा भाऊच जिंकणार’, असा विश्वास व्यक्त केला आहे.बिग बॉस १६ या पर्वात सध्या शिव ठाकरेची चर्चा पाहायला मिळत आहे. शिव ठाकरे हा सध्या या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आहे. नुकतंच शिव ठाकरेची बहिण मनिषा ठाकरेने ‘एबीपी माझा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला.दरम्यान बिग बॉस हिंदीच्या १६ व्या पर्वात शिव ठाकरे हे नाव सातत्याने चर्चेत आहे. या नावाची चर्चा ही सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहे. त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आही. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला पाठिंबा देखील मिळत आहे. त्याची खेळी चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने