कोण म्हणे IT क्षेत्रात फक्त कोडींग करून जॉब मिळतो? नॉन IT लोकांनी असा मिळवा जॉब

मुंबई : आयटी क्षेत्रातली नोकरी म्हणजे केवळ कोडिंग किंवा प्रोग्रामिंग करणे हा एक गैरसमज आहे.तुम्हाला आयटी कंपनीमध्येच नोकरी करायची इच्छा असेल मात्र कोडींग करायची इच्छा किंवा तयारी किंवा क्षमता नसेल तर तुम्ही खालीलपैकी एका क्षेत्रामध्ये प्राविण्य किंवा पदवी/पदविका संपादन करून आयटी मध्ये करिअर करू शकता.सॉफ्टवेअर टेस्टिंग किंवा काही ठिकाणी ह्याला क्वालिटी कंट्रोल म्हणतात, ह्यात डेव्हलपर्सने कोडिंग केलेल्या सॉफ्टवेअर किंवा सॉफ्टवेअर प्रणालीचे टेस्टिंग करून तुम्ही त्यातल्या चुका/अनियमितता/अपूर्णता शोधून काढून bug report करू शकता.ह्या कामासाठी तुम्ही कॉम्प्युटर / आयटी इंजिनीअर असलेच पाहिजे असे नाही, सॉफ्टवेअर टेस्टिंगचा चांगला कोर्स करून तुम्ही जॉब शोधू शकता.

१. टेक्निकल रायटिंग - IT कंपनी ने तयार केलेलं सॉफ्टवेअर अथवा सॉफ्टवेअर प्रॉडक्ट , किंवा त्यांच्या नवनवीन versions चा वापर नक्की कशा प्रकारे करावा ह्याचं document अथवा User Manual लिहीणाऱ्या व्यक्तीस Technical Writer म्हणतात.यासाठी मुळात तुम्हाला विषय समजून घेऊन मग तो सोप्या आणि कमी क्लिष्ट इंग्लिश मध्ये end user ला म्हणजेच सामान्य वापरकर्त्याला समजावून सांगायची कला हवी. ह्याचे कोर्सेस ही उपलब्ध आहेत. ऑनलाइन कोर्सेस पण शोधू शकता.२. मार्केटिंग / डिजिटल मार्केटिंग - तुम्ही मार्केटिंग मध्ये डिप्लोमा किंवा MBA केलेले असले तरी तुम्हाला IT कंपनी मध्ये संधी मिळू शकते. 

३. HR किंवा फायनान्स मध्ये MBA/PGDM केलेल्यांना पण संधी मिळू शकते. ह्यात नोकरभरती (recruitment), HR generalist , Finance controller, business finance ह्या department मध्ये संधी मिळू शकते.तसेच MBA (IT/Systems) केल्यास कोडींग न करता थेट business analyst किंवा प्रोजेक्ट मॅनेजर बनायची संधी पण मिळू शकते.Business Analyst / Functional Analyst - क्लाएंटला त्यांना सॉफ्टवेअर मध्ये अभिप्रेत असलेली उपयुक्तता प्रोजेक्ट मॅनेजर किंवा technical/coding टीम ला समजावून सांगायची हातोटी असलेला घटक म्हणजे business analyst.Client कडून requirement gathering करून घेणे आणि त्याचे रूपांतर शेवटी एका परिपूर्ण सॉफ्टवेअर मध्ये कसे करता येईल ह्याचे साधारण टप्पे आखून देणे हे काम BA करतात.वरील प्रकारच्या profiles मध्ये पण तुम्ही IT कंपन्या मध्ये कोडींग येत नसताना सुद्धा जॉब मिळवू शकता.

नोंद - वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारलेली आहे. अधिक माहितीसाठी त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने