यंदा इजिप्तला बहुमान; प्रजासत्ताक दिनाला पाहुण्यांची निवड कशी केली जाते!

दिल्ली: गेल्या दोन वर्षांत, कोरोनाच्या धोक्यामुळे, प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी कोणत्याही परदेशी पाहुण्याला आमंत्रित केले गेले नाही. पण यावेळी 2023 च्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देह फतेह एल सिसी प्रमुख पाहुणे म्हणून येत आहेत.1950 मध्ये पहिल्यांदा देशात प्रजासत्ताक दिन साजरा झाला आणि तेव्हापासूनच मित्र देशांच्या राष्ट्राध्यक्षांना आणि नेत्यांना बोलावण्याची परंपरा सुरू आहे. गेल्या 70 वर्षात अनेक देशांच्या प्रमुखांना हा मान मिळाला आहे.  भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे इंडोनेशियाचे तत्कालीन राष्ट्रपती सुकर्णो होते. तर यंदा इजिप्तला हा मान मिळाला आहे. पण, हि निवड नक्की कशी केली जाते, हे तूम्हाला माहिती आहे का?, नाही ना त्याबद्दलच आज जाणून घेऊयात.एक स्वतंत्र, सार्वभौम आणि लोकशाही देश म्हणून भारताने २६ जानेवारी १९५० रोजी आपली राज्यघटना लागू केली. तेव्हापासून भारत एक लोकशाही प्रजासत्ताक असल्याने दरवर्षी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एका भव्य समारंभाचे आयोजन केले जाते आणि भारत सरकारकडून दरवर्षी परदेशी नेत्याला आमंत्रित केले जाते.

इतर देशातील पाहुणेच का?

भारताचे राष्ट्रपती आणि संबंधित देशाचे प्रमुख यांच्यातील मैत्री यातून प्रतिबिंबित होते. या मैत्रीचे राजकीय महत्त्वदेखील असते. भारताचे इतर देशांशी असलेले संबंध अधिक दृढ करण्यासाठी संबंधित देशातील प्रमुखांना निमंत्रित केले जाते.सहा महिने आधीच सुरू होते प्रक्रिया

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त प्रमुख पाहुण्यांची निवड करताना अनेक गोष्टींचा विचार केला जातो. ही प्रक्रिया सहा महिन्यांपूर्वी सुरू होते. भारत आणि संबंधित देशातील संबंधांचा प्रामुख्याने विचार केला जातो. तसेच भारताचे राजकीय, व्यावसायिक, लष्करी आणि आर्थिक हितसंबंधांचाही विचार केला जातो.परराष्ट्र मंत्रालय पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांकडून यासाठी परवानगी घेते. त्यांच्या सल्ल्यानंतर किंवा परवानगी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरु होते. त्या देशात भारताचे राजदूत असे जाणून घेतात की, त्या दिवशी देशाची प्रतिनिधी उपलब्ध असतील की नाही. त्याचसोबत काही कारणास्तव ते निमंत्रण तर स्विकारत नाहीत ना ही सुद्धा शक्यता असते.

पाहुण्यांची काळजी घेतली जाते

एकदा का आमंत्रण स्विकार केल्यानंतर पुढील काही गोष्टी केल्या जातात. जसे मुख्य अतिथींसोबत कोणकोण येणार, त्यांचा खासगी स्टाफ ज्यामध्ये सुरक्षारक्षक, वैद्यकिय आणि अन्य अधिकाऱ्यांचा समावेश असतो. अतिथींच्या परिवारातील सदस्य सुद्धा येतात. त्यांच्यासाठी सुद्धा खास काळजी घेतली जाते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने