१२ वर्षाखालील मुलांना घेऊन पठाण पहायला जाताय..मग ही बातमी तुमच्याचसाठी...

मुंबई: शाहरुख खान स्टारर 'पठाण' हा चित्रपट 25 जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. यापूर्वी, ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन (BBFC) ने चित्रपटाला 12A प्रमाणपत्र दिले आहे. बोर्डाने आपल्या वेबसाइटवर 12A प्रमाणपत्र देण्याचे कारणही दिले आहे.ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्मने चित्रपटाला 12A प्रमाणपत्र देण्यामागे या चित्रपटात हिंसा, सेक्स, भयपट आणि धमकीची दृश्ये असल्याच नमूद केलं आहे. या चित्रपटात बंदुकीच्या गोळीतून बाहेर पडणारे रक्त दाखवण्यात आले आहे जे मुलांसाठी योग्य नाही.त्याच बरोबर चित्रपटात वेश्याव्यवसाय देखील दाखवण्यात आला आहे, ज्यामुळे मुलांवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत या चित्रपटाला 12A प्रमाणपत्र देण्यात आले आहे. असे कारण बोर्डाने सांगितले आहे. त्यामुळे १२ वर्षाच्या खालील मुलांना हा चित्रपट पाहण्यासाठी बंधन असणार आहेत.146 मिनिटांच्या या चित्रपटात अशी अनेक दृश्ये आहेत जी मुलांवर चुकीची परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हा चित्रपट १२ वर्षांखालील मुलांना एकट्याने पाहण्याची परवानगी नाही. मुले त्यांच्या पालकांसोबत हा चित्रपट पाहू शकतात.त्याचबरोबर परदेशात चित्रपटाला 12A प्रमाणपत्र मिळणे म्हणजे हा चित्रपट मुलांना दाखवण्यापूर्वी पालकांनीही या चित्रपटाचा आपल्या मुलांवर कोणताही दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असणार आहे.बीबीएफसीच्या वेबसाईटवरही या चित्रपटातून एक सीन काढून टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शाहरुख च्या 'पठाण' चित्रपटातून कोणता सीन हटवण्यात आला आहे याबाबत पुष्टी झालेली नाही.भारतात, पठाणला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने यूए प्रमाणपत्र दिले आहे. UA प्रमाणपत्र देण्यापूर्वी या चित्रपटात 10 कट करण्यात आले आहेत. यादरम्यान दीपिकाचे काही क्लोज-अप शॉट्स चित्रपटातून काढून टाकण्यात आले आणि काही संवादही बदलण्यात आले. या पूर्वी टायगर श्रॉफ आणि हृतिक रोशनच्या वार चित्रपटातील काही दृश्ये ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन तर्फे काढण्यात आली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने