तब्बल 50 हजार वर्षानंतर अवकाशात दिसलं अद्भूत दृष्य...!

दिल्ली: अंतराळात वेगवेगळ्या हालचाली सुरु असतात. अंतराळात फार अनोख्या गोष्टीही बघायला मिळतात. नुकतंच अंतराळात एक अद्भूत दृष्य बघायला मिळालंय. तब्बल ५० वर्षांनी हा धुमकेतू पृथ्वीच्या जवळून गेलाय. खगोलप्रेमींसाठी ही एक पर्वणी मानली जाते.
सुमारे 50 हजार वर्षांनंतर दिसलं अदभूत दृष्यं

50 हजार वर्षानंतर पृथ्वीच्या जवळून हिरव्या रंगाचा धूमकेतू गेला आहे. लद्दाखमधील हानले येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्सच्या (IIA) शास्त्रज्ञांनी हिरव्या धूमकेतूचे अप्रतिम फोटो टिपले आहेत. यासाठी खास दुर्बिणीचा वापर करण्यात आला. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, नेमकी हीच घटना निएंडरथल मानवाच्या काळात घडली होती, तेव्हा अंतराळ विज्ञानानास याबाबतची माहिती सुद्धा नव्हती.

या धूमकेतूचा शोध मार्च २०२२ मध्ये लागला

या धूमकेतूला C/2022 E3 (ZTF) असे नाव देण्यात आले आहे. कॅलिफोर्नियाच्या झ्विकी ट्रान्झियंट फॅसिलिटीच्या शास्त्रज्ञांनी मार्च 2022 मध्ये हा धूमकेतू शोधला आणि तेव्हापासून ते या धूमकेतूचा मागोवा घेत आहेत. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, या धूमकेतूला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यास बराच वेळ लागतो. यावेळी हा धूमकेतू पृथ्वीपासून सुमारे 26 दशलक्ष मैल दूर गेला. शास्त्रज्ञांच्या मते, हिरव्या धूमकेतूला सूर्याभोवती त्याची कक्षा पूर्ण करण्यासाठी हजारो वर्षे लागतात. याआधी हा धूमकेतू 50 हजार वर्षाआधी दिसला होता. यानंतर हा धूमकेतू कधी दिसेल हे सांगता येत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने