भाजप, जेडीयू युतीबाबत मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं मोठं वक्तव्य

बिहार: बिहार भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या परिषदेत मोठा निर्णय घेत भाजप नितीश कुमार यांच्याशी कोणत्याही बाबीवर तडजोड करणार नसल्याचे सांगण्यात आले. बिहारमध्ये भाजपचे सरकार लवकरच स्थापन होईल असं भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते सम्राट चौधरी म्हणाले होते.यावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले आम्ही मरू पण भाजपसोबत कधीच जाणार नाही. ते महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त नितीश कुमार पाटण्यातील गांधी घाटावर गेले होते, यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. नितीश कुमार म्हणाले, आम्ही मरण पत्करू पण भाजपसोबत जाणार नाही.बिहार भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या परिषदेत मोठा निर्णय घेतला आहे. भाजप पुन्हा नितीश कुमार यांच्याशी कोणत्याही बाबीवर तडजोड करणार नाही. त्या निर्णयावर आज पत्रकारांनी नितीश कुमार यांना प्रश्न विचारला आसता. त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने