अरे आवरा! जरा लाज वाटू द्या.. शालिन- टीनाचा रोमान्स पाहून स्पर्धक संतापले..

मुंबई:  टिव्हीवरील सर्वात लोकप्रिय वादग्रस्त शो बिग बॉस 16 मध्ये नवीन वर्षाच्या निमित्ताने खास सेलिब्रेशन करण्यात आले. बिग बॉसने नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जकूझी बाथटबसह एमसी स्टॅनचा कॉन्सर्ट झाला, ज्यामध्ये सर्व घरातील सदस्यांनी खूप मजा केली. या रॅप कॉन्सर्टमध्ये एमसी स्टेन व्यतिरिक्त इक्का आणि सीधा मौत यांनीही आपल्या जबरदस्त गाण्यांनी स्पर्धकांची मने जिंकली. त्यामुळे टीना दत्ता आणि शालीन भानोत कॉन्सर्ट दरम्यान इतके रोमँटिक झाले की त्याना कुणाचं भान नव्हत. त्यातच शोचा एक नवीन प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये घरातील सदस्य टीना आणि शालीनच्या नात्याबद्दल प्रश्न विचारत आहेत.रॅप शो कॉन्सर्ट दरम्यान शालीन भानोत आणि टीना दत्ता यांनी रोमँटिक डान्स केला होता, ज्यामुळे ते दोघेही ट्रोलच्या निशाण्यावर आले होते. आता घरातील सदस्यही टीना आणि शालीनचं प्रेम हे खोटं असल्याचं बोलतं आहे. ते केवळ दिखावा असल्याचं सांगत आहेत.व्हिडिओमध्ये अर्चना म्हणते की, "लोकांसमोर असं बरं वाटतंय का? इथे करा, त्यांना लाज वाटत नाही." तर तिकडे साजिद खान म्हणत आहे की हे टॉप लेव्हलचे फ्रॉड लोक आहेत. हे केवळ नॉमिनेशन टाळण्यासाठी आहे. तर दुसरीकडे शिव ठाकरे शालीन आणि टीनाच्या नात्याबद्दल शिवला वाटतयं की, ते मूद्दाम पब्लिकमध्ये असं करतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने