कोरोनाला हलक्यात घेऊ नका! देशात 24 तासांत 1300 टक्के वाढ

दिल्ली : सध्या जगभरात पुन्हा एकदा कोरोना महामारीचा धोका वाढला आहे.सगळीकडे चिंता वाढली असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात मागच्या २४ तासांत कोरोनाचे २,५८२ नवे रुग्ण आढळले असल्याची माहिती दिली आहे. तर २२२ लोक बरे झाले आहेत.मागच्या २४ तासात तब्बल १३०० टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. यापूर्वी १ जानेवारी रोजी १७३ रुग्ण सपडले होते तर मागील २४ तासात १,५१,१८६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

रिकव्हरी रेट किती आहे?

देशात मागील २४ तासांत ४५,७६९ वॅक्सीनचे डोस देण्यात आले आहेत, यादरम्यान सध्या रिकव्हरी रेट ८९.८ टक्के आहे. तसेच दररोजचा पॉझिटीव्हिटी रेट ०.०९ टक्के तर साप्ताहिक पॉझिटीव्हिटी रेट हा ०.१३ इतका आहे.दरम्यान मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ९१.१२ कोटी कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ४,४१,४५,६६७ झाली आहे.जगभर कोरोनाचे थैमान

सध्या चीनसह अनेक देशात कोरोनाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमिवर भारतात देखील कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू शकते हे पाहाता शासकिय यंत्रणा अलर्टवर आहेत. चीनमध्ये कोरोनामुळे वाईट स्थिती पाहायला मिळत आहे. चीनमध्ये वेगाने पसरत असलेल्या ओमिक्रॉन सब-व्हेरिएंट BF.7 या ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटने भारतात देखील एंट्री केली आहे.यादरम्यान केंद्रिय आरोग्य मंत्री मनसुख मंडविया यांनी उच्चस्तरिय बैठक घेत ओमिक्रॉनच्या नव्या सब-व्हेरिएंटबाबत बैठक घेतली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने