इटुकले पाय, पिटुकले हात...; आलिया-रणबीरच्या छोट्या परीची पहिली झलक!

मुंबई:  अभिनेत्री आलिया भट आणि रणबीर कपूर हे नुकतेच आई बाबा झाले आहेत. दोन महिन्यांपूर्वीच आलिया भटने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. या मुलीची पहिली झलक नुकतीच समोर आली आहे.बॉलिवूडच्या प्रसिद्ध जोड्यांपैकी एक असलेल्या रणबीर आणि आलियाची जोडी कायम चर्चेत असते. या दोघांनी आपल्या लेकीचं नाव राहा असं ठेवलं आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी या दोघांचेही चाहते खूप उत्सुक आहेत. आता ही उत्सुकता काहीशी कमी झाली आहे. राहा पहिल्यांदाच आलिया रणबीरसोबत सार्वजनिक ठिकाणी दिसली आहे.आलिया रणबीरचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात त्यांच्यासोबत त्यांची लेक राहासुद्धा दिसत आहे. या फोटोत आलिया आणि रणबीर राहाला घेऊन कुठेतरी जात आहेत. आलियाने राहाला कडेवर घेतलं आहे. तिने गुलाबी रंगाचे कपडे घातले आहेत.इन्स्टंट बॉलिवूड आणि विरल भयानी या इन्स्टाग्राम पेजने हे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये राहाचे चेहरा स्पष्ट दिसत नाही. पण तिचे छोटेसे हात पाय दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत ती तिच्या बाबागाडीमध्ये बसलेली दिसत आहे. हे पाहूनही चाहते खूप खूश झाले आहेत. आता तिचा चेहरा बघण्याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने