दुसरं लग्न करुन दाऊद...; हसीना पारकरच्या मुलाने उलगडलं मुंबई कनेक्शन

मुंबई: दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्या मुलाने दाऊदबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत. दाऊदने पाकिस्तानी मुलीशी दुसरं लग्न केल्याचंही त्याने सांगितलं. शिवाय मुंबई कनेक्शनही उघड केलं आहे.दाऊदचा भाचा आणि हसीना पारकर हिचा मुलगा अलिशाह पारकर सध्या एनआयएच्या ताब्यात आहे. त्याच्या चौकशीदरम्यान त्याने हे खुलासे केले आहेत. मोस्ट वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानातल्या कराचीमध्ये राहत असल्याचं अलिशाहने सांगितलं आहे.दाऊदने दुसरं लग्न केलं आहे. त्याची नवी पत्नी पाकिस्तानातल्या एका पठाणी कुटुंबातली आहे, असंही त्यांने सांगितलं. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच दाऊदने दुसरा संसार थाटल्याचं अलिशाहने सांगितलं आहे. दाऊदची पहिली पत्नी मेहजबीन मुंबईतल्या तिच्या नातेवाईकांच्या संपर्कात आहे. त्यामुळे दाऊद अप्रत्यक्षपणे मुंबईशी संबंधित असल्याचीही माहिती मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने