क्या बात है.. अंकुशचा आणि लग्नाचा वाढदिवस एकाच दिवशी, दीपा म्हणाली...

मुंबई: आज मराठी इंडस्ट्रीतील सुपरस्टार अंकुश चौधरीचा वाढदिवस आहे. अंकुशला त्याचे तमाम फॅन्स आज सकाळपासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच अंकुशची बायको आणि अभिनेत्री दीपा चौधरी हिनेही लाडक्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. दीपाने अंकुशसाठी खास रोमँटीक पोस्ट लिहून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.दीपाने सोशल मीडियावर अंकुश सोबतचे खास फोटो पोस्ट केले आहेत. त्या फोटोखाली दिपाने खास कॅप्शन लिहिलंय. दीपा लिहिते,"वाढदिवसाच्या आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. प्रत्येक वर्ष जात असताना, मी तुझ्या आणखी प्रेमात पडते. माझ्या बाबतीत घडलेली सर्वोत्तम गोष्ट तू आहेस.

 


जीवनाच्या प्रत्येक पैलूत आपल्या बायकोला साथ देणारा धीरगंभीर पती असल्याबद्दल धन्यवाद! मी तुझ्यावर प्रेम करते" अशी खास पोस्ट दीपाने अंकुशसाठी लिहिली आहे.अंकुशचा वाढदिवस आणि अंकुश आणि दीपा यांच्या लग्नाचा वाढदिवस हा एकाच दिवशी असल्याने मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी या दोघांना कमेंट करून शुभेच्छा दिल्या आहेत. अंकुश आणि दीपाच्या लग्नाला १६ वर्ष पूर्ण झाली आहेत. २००७ ला या दोघांनी लग्न केलेलं. या दोघांना प्रिन्स हा मुलगा आहे.अंकुश आणि दीपाची लव्हस्टोरी जरा हटके आहे. चला हवा येऊ द्या शो मध्ये अंकुशने खुलासा केला होता, तो म्हणाला, "आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो. आम्ही अशा टप्प्यावर होतो जिथे आम्ही मित्रांपेक्षा जास्त आणि जोडप्यांपेक्षा कमी होतो. 

आमचं कॉलेज लोअर परळच्या पुलापासून खूप जवळ होतं आणि ती ब्रिजवरून चालत होती. मी तिच्या मागे पळत होतो. मी स्पष्टपणे आठवते की आसपास खूप गर्दी होती आणि मी गर्दीत तिला प्रपोज करायचे ठरवले. मी माझ्या गुडघ्यावर खाली बसलो आणि तिला एक गुलाब दिला आणि तिला प्रपोज केले. त्या दिवशी मला खूप आनंद झाला होता."अंकुश आणि दीपा दोघेही मनोरंजन क्षेत्रात व्यस्त आहेत. दीपा सध्या झी मराठीवरील तू चाल पुढं मालिकेत अभिनय करत आहे. तर अंकुश लवकरच केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात अंकुश शाहीर साबळेंची भूमिका साकारत आहे. हा खूप मोठा प्रोजेक्ट असून अंकुशच्या या सिनेमाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने