धनंजय मुंडे यांच्या गाडीला परळीत अपघात

परळी: गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय नेत्यांबाबत अपघाताचे सत्र सुरु आहे. आता राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला परळीत येथे अपघात झाला आहे. या अपघातामध्ये मुंडे किरकोळ जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काल परळीतील आझाद चौकात रात्रीच्या वेळी ही घटना घडली. रात्री सुमारे पावणे तीन वाजेच्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला. यावेळी धनंजय मुंडे स्वतः गाडी चालवत होते.काल परळीतील आझाद चौकात रात्रीच्या वेळी ही घटना घडली. रात्री सुमारे पावणे तीन वाजेच्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला. यावेळी धनंजय मुंडे स्वतः गाडी चालवत होते.अपघात नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. धनंजय मुंडे यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारांसाठी धनंजय मुंडे यांना मुंबईत हलवणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने