काय झालीय दयाबेनची स्थिती! कशी दिसतेय, नुसती रडतेय

मुंबई:  टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये ज्या मालिकेची नेहमीच चर्चा होत असते त्या तारक मेहता का उल्टा चष्म्याची गोष्टच वेगळी आहे. त्या मालिकेतील लोकप्रिय व्यक्तिरेखा म्हणजे दयाबेन. दिशा वकानीनं ही भूमिका केली आहे. तिच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.सोशल मीडियावर दिशा वकानीचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. त्यामध्ये तिनं एका मुलाला कडेवर घेतले आबहे. त्यातून ती आपली व्यथा मांडताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर वेगवेगळया प्रतिक्रिया देऊन दिशा वकानीला ट्रोल केले आहे. दयाबेनला काय झाले आहे असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

त्या व्हिडिओमध्ये दिशाचं रडणं काही थांबण्याचे नाव घ्यायला तयार नाही. बऱ्याच दिवसांपासून दया बेन ही तारक मेहतामधून गायब आहे, त्यामुळे अगोदरच चाहते तिच्यावर नाराज आहे. अशावेळी तिचा असा व्हिडिओ समोर आल्यानं त्यांनी तिला प्रश्न विचारुन भंडावून सोडले आहे. त्या व्हिडिओतून दिशानं आपल्यासमोर काय परिस्थिती उभी राहिली आहे तिनं सांगितलं आहे. नेमकं असं झालं काय...हे चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे.खरं तर तो एक व्हायरल व्हिडिओ आहे. सी कंपनी चित्रपटातील त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांना वेगळयाच प्रश्नात पाडले आहे. २००८ मध्ये रिलिज झालेल्या त्या चित्रपटामध्ये मिथुन चक्रवर्ती, तुषार कपूर आणि अनुपम खेर यांच्या मुख्य भूमिका होत्या. तुषार कपूरनं त्यामध्ये पत्रकाराची भूमिका साकारली होती. त्यातून दिशाचा एक वेगळा लूक समोर आला आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी तिला वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.आता आम्हाला कळलं की दयाबेन एवढी तिच्याच विश्वात का गुंगलेली असते, तिला बाकी काहीच सुचत नाही. सारखी रडत असते. दयाबेन तू आता परत तारक मेहता मालिकेमध्ये पुन्हा ये....असे आवाहन चाहत्यांनी तिला केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने