वादळ पुन्हा येतयं! दोन वर्षानंतर सोशल मीडियावर पुन्हा दिसणार तिखट प्रतिक्रिया

अमेरिका: वादग्रस्त विधानं आणि प्रतिक्रियांमुळे चर्चेत असणारे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्फ पुन्हा एकदा सक्रीय होणार आहेत.येत्या आठवड्यात ट्रम्फ याचे फेसबुक आणि इंस्ट्राग्राम खाती पुन्हा सुरू केली जाणार आहेत,अशी घोषणा मेटाने केली आहे. त्यामुळे आगामी काळात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा फेसबुक आणि इंस्टाग्रामवर तिखट प्रतिक्रिया देताना दिसणार आहेत.
6 जानेवारी 2021 रोजी अमेरिकन संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फेसबुकने बंदी घातली होती.2020 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदानात हेराफेरी झाल्याचा दावा ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केला होता.त्यानंतरच फेसबुकने डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंटवर हिंसा भडकावल्याच्या आरोपावरून बंदी घातली होती.ट्विटरनेही डोनाल्ड ट्रम्पवर बंदी घातली आहे. मात्र, मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते पुन्हा सुरू केले आहे.परंतु, ट्वीटर खातं सुरू झाल्यानंतरही अद्यपर्यंत ट्रम्प यांनी एकही ट्विट केलेले नसून, ट्विटरऐवजी ट्रम्फ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर पोस्ट करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने