न्यू इयर पार्टी, १२ किमी फरफटवत झालेला तरूणीचा मृत्यू.. दिल्लीच्या कंझावाला केसमधले १० ठळक मुद्दे काय आहेत?

 दिल्ली : ३१ डिसेंबरच्या रात्री सगळा देश नव्या वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषात बुडाला होता. त्यावेळी राजधानी दिल्लीमध्ये एक वीस वर्षाच्या तरूणीचा दुर्दैवी अंत झाला. तिचा अपघात इतका भीषण होता की ज्या कारने तिला धडक दिली त्या कारने तिला १२ किमी फरफटवत नेलं. या अपघातात फरफटवत नेलं गेल्याने तरूणीच्या अंगावरचे सगळे कपडेही फाटले. १ जानेवारीच्या पहाटे पोलिसांना या तरूणीचा विवस्त्र मृतदेह कंझावाला या ठिकाणी आढळला. दिल्लीतल्या सुलतानपुरी मधला हा भीषण अपघात अंगावर काटे आणणारा आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. पोलिसांनी अनेक गोष्टी समोर आणल्याचा दावा केला आहे. तरीही या प्रकरणातले दहा ठळक मुद्दे काय आहेत आपण जाणून घेऊ

१) अपघात झाला तेव्हा दिल्लीतली तरूणी स्कुटीवर एकटी नव्हती?
दिल्लीतल्या तरूणीच्या अपघाताचा तपास सुलतानपुरी पोलीस करत आहेत. पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज लागलं आहे. ज्यामध्ये ही मुलगी रात्री पावणेदोनच्या सुमारास एका हॉटेलमधून बाहेर पडताना दिसते आहे. तिच्यासोबत तिची एक मैत्रीणही दिसते आहे. तिची मैत्रीण स्कुटी चालवत आहे हेदेखील दिसतं आहे. काही वेळाने या तरूणीने आपल्या मैत्रिणीला गाडी मी चालवते असं म्हटलं त्यानंतर ही तरूणी गाडी चालवू लागली. त्यानंतर काही वेळातच हा अपघात झाला.

२) हॉटेल मॅनेजरचा दावा चक्रावून टाकणारा
ज्या हॉटेलमध्ये ही मुलगी पार्टी करायला गेली होती तिथल्या मॅनेजरने हे सांगितलं की ही मुलगी आणि तिची मैत्रीण या दोघींचं कशावरून तरी भांडण झालं होतं. त्यानंतर या दोघींना हॉटेलमधून बाहेर जाण्यास सांगितलं. आता पोलीस हा वाद नेमका कशावरून झाला होता याचा शोध घेत आहेत.


३) तरूणीसोबत असलेले आणखी लोक कोण?
या तरूणीसोबत आणि तिच्या मैत्रिणीसोबत आणखी ही काही लोक होते असंही कळतं आहे. पोलीस त्या अनुषंगाने तपास करत आहेत. हॉटेलच्या जवळून काही लोकांना आम्ही ताब्यात घेतलं आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे. यांच्याकडून काय माहिती समोर आली आहे ते कळलेलं नाही.

४) ४ किमी नाही १२ किमी फऱफटवला मृतदेह
दिल्लीतल्या तरूणीची बातमी जेव्हा आली तेव्हा तिला ४ किमी पर्यंत फरफटवत नेलं असं सांगण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात तिला १२ किमी फरफटवत नेण्यात आलं होतं. सुरूवातीला ही माहिती देण्यात आली नव्हती. ज्या गाडीने तरूणीला धडक दिली ती गाडी आऱोपींची नव्हती असंही पोलिस पोलिसांनी सांगितलं ते का?

५) पार्टी करून परतत होते आरोपी?
या प्रकरणातले पाच आरोपी हे कारमध्ये बसून आले ती कार मित्राची होती. दीपक खन्ना आणि अमित खन्ना या दोघांनी ही कार आशुतोष नावाच्या मित्राकडून घेतली होती. जेव्हा आम्ही कारने स्टुकीला उडवलं तेव्हा आम्ही तिथून पळ काढला. कार तिथेच सोडून दिली जी मित्र आशुतोषकडून घेतली होती. आशुतोषला आम्ही हे सांगितलं तुझ्या गाडीने आम्ही एका स्कुटीला उडवलं आहे. ही कार आशुषतोषच्या मेहुण्याची होती असंही समजतं आहे.

६) आरोपींनी केले नवे खुलासे

अटक करण्यात आलेल्या पाचजणांपैकी दीपकने पोलिसांना सांगितलं की तो गाडी चालवत होता. त्याच्या जवळ मनोज बसला होता. तर इतर तीन आरोपी मिथुन, कृष्णा आणि अमित हे मागच्या सीटवर बसले होते. स्कुटीला धडक दिल्यानंतर आम्ही तिथून पळ काढला. आम्ही कार कंझावालामध्ये कार थांबवली तेव्हा कळलं की त्यात मृतदेह अडकला आहे. त्यानंतर आम्ही घाबरलो आणि तो मृतदेह तसाच सोडून पळालो. त्याआधी कार आशुतोषच्या घरी लावल्याचंही त्यांनी सांगितलं.

७) फॉरेन्सिक टीमचा तपास सुरू
पोलिसांनी या प्रकरणात फॉरेन्सिक टीमची मदत घेतली आहे. फॉरेन्सिकने काही टीम्स तयार केल्या आहेत ज्या सखोल तपास करत आहेत. तसंच पुरावे गोळा करत आहेत. सीसीटीव्हीही बारकाईने पाहिला जातो आहे. एकाही दोषी आरोपीला आम्ही सोडून देणार नाही असं पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबाला सांगितलं आहे.

८) बलात्कार झाल्याचा संशय
पोलिसांना असं वाटतं आहे की अपघात झालेल्या तरूणीवर अपघाताच्या आधी बलात्कार झाला असावा. पोस्टमॉर्टेमचा रिपोर्ट आल्यानंतरच याबाबत स्पष्टता येणार आहे. पीडितेचा मृत्यू कसा झाला हे पोस्टमॉर्टेम रिपोर्ट मध्ये समजू शकणार आहे.

९) पीडितेच्या मृतदेहावर आज अंत्यसंस्कार
अपघातत बळी पडलेल्या या तरूणीचा मृतदेह आज तिच्या कुटुंबियांना सोपवला जाणार आहे. ज्यानंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील

१०) विशेष आयुक्त करणार तपास

या प्रकरणात विशेष आयुक्त शालिनी सिंह या अंतर्गत तपास करणार आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल त्या गृहमंत्रालयाला देतील. पोलीस घटनास्थळी कधी पोहचले त्यांनी काय केलं? या सगळ्याचा विस्तृत अहवाल दिला जाणार आहे. आज तकने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने