भारतात जूननंतर आर्थिक मंदी येणार; नारायण राणेंनी स्पष्टच सांगितलं!

पुणे: भारतात आर्थिक मंदी जून नंतर अपेक्षित आहे असं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. राणे हे आज पुण्यात होणाऱ्या जी २० परिषद निमित्त माध्यमांशी संवाद साधत होते.पुण्यात आज जी-२० परिषदेचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झालं. त्यानंतर ते बोलत होते. नारायण राणे म्हणाले, "जगातील अनेक मोठ्या देशांमध्ये मंदी आहे. भारतात आर्थिक मंदी जून नंतर अपेक्षित आहे पण त्याची झळ सामान्य नागरिकांना बसून यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे".
जी-२० परिषदेचं आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. त्यांच्या नेतृत्वात देश प्रगती करत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. अमेरिका, चीन, जपान जर्मनी यानंतर भारत पाचव्या क्रमांकावर येण्याच्या प्रयत्नात आहे, असंही राणे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने