अर्थमंत्र्यांकडून सर्वेक्षण सादर; इतका असणार GDP

दिल्ली: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून त्याची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाली आहे.राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लगेचच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजासाठी खासदार लोकसभेत पोहोचले. यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर केले. सादर करण्यात आलल्या या सर्व्हेक्षणात 2023-24 मध्ये देशाचा आर्थिक विकास दर 6.5% राहिल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.जगभरात मंदीचे सावट असतानाही भारताचा आर्थिक विकास दर पुढील आर्थिक वर्षात म्हणजे 2023-24 मध्ये 6.5% राहील असे सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्व्हेक्षणात सांगण्यात आले आहे. आर्थिक सर्व्हेक्षणात नेमकं काय?

आर्थिक सर्वेक्षणात 2022-23 मध्ये आर्थिक विकास दर 7 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी 2021-22 चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला तेव्हा 2022-23 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 8 ते 8.5 टक्के दराने वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. युक्रेन आणि रशियामधील युद्ध आणि जागतिक आर्थिक संकटामुळे आर्थिक विकास दर गेल्या वर्षी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा कमी असू शकतो असे नमुद करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने