त्रिपुरा, मेघालय अन् नागालँडमध्ये विधानसभांचं बिगुल वाजलं

दिल्ली:  ईशान्येकडील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे.त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारीला तर, नागालँड आणि मेघालयमध्ये 27 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून, 2 मार्च रोजी निकाल जाहीर होणार अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी बुधवारी दिली.त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तिन्ही राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ मार्चमध्ये संपत आहे. तिन्ही राज्यांमध्ये 60-60 सदस्यांच्या विधानसभा आहेत.2018 प्रमाणे यावेळीही तिन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात होऊ शकतात. तिन्ही राज्यांमध्ये 60-60 सदस्यांच्या विधानसभा आहेत.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने