बिग बॉस करणार धमाका! एक दोन नव्हे तर 'हे' तीन स्पर्धक जाणार घराबाहेर..

मुंबई:   बिग बॉस 16' हा रिअॅलिटी शो दिवसेंदिवस रंजक होत आहे. या सीझनमध्ये खूप काही खास, वेगळं आणि नवीन झालयं मग ते स्पर्धकांच्या बाबतीत असो किंवा त्याच्या नॉमिनेशनबद्दल.मागील काही सीझनमध्ये दर आठवड्याला किंवा दोन आठवड्यांनी नामांकन व्हायचं मात्र या सीझनमध्ये काही वेगळंच चित्र आहे. बरेच स्पर्धक अजूनही घरीच आहे. गेल्या आठवड्यातही कोणालाही घरातुन काढण्यात आलेले नाही.मात्र या आठवड्यात चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. श्रीजीता डे ची घरातुन एक्झीट होणार आहे, पण त्याचं बरोबर साजिद खान आणि अब्दू रोजिक यांनाही घरातून बाहेर काढण्यात येणार असल्याचं बोललं जातं आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.घरातील संपूर्ण आठवड्याच्या एपिसोडबद्दल बोलायचं झालं तर शोमध्ये फॅमिली वीक सुरू होता. शिवच्या आईपासून ते प्रियंका चहर चौधरीचा भाऊ घरात आला होते.शेवटच्या एपिसोडमध्ये सुंबुलचे वडील, श्रीजिताचा बॉयफ्रेंड आणि सौंदर्याच्या आईने एंट्री घेतली. घरात एक कॅप्टनसी टास्कही होता, ज्यात शिव ठाकरे सर्वांना पराभूत करून कॅप्टन झाला. या आठवड्यात एलिमिनेशनही घरातच झाले. या आठवड्यात सुंबूल, एमसी स्टॅन, निम्रत आणि श्रीजीता यांना नॉमिनेट करण्यात आलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने