सणसणीत कानाखाली देऊन दीपा करणार श्वेताचा पर्दाफाश! असा असेल एपिसोड..

मुंबई: लोकप्रिय मालिका 'रंग माझा वेगळा'ने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. गेले कित्येक वर्ष या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकत टीआरपी मध्ये पहिला नंबर कायम राखला आहे. अखेर या मालिकेत आता मोठा ट्विस्ट येणार आहे.दीपा आणि कार्तिक यांच्यात आलेला दुरावा हा प्रेक्षकांना पसंत पडला नव्हता. ते कधी एकत्र येतील याची वाट प्रेक्षक पाहत होते. कार्तिकने दीपावर केलेले घाणेरडे आरोप नेटकऱ्यांना मुळीच आवडले नव्हते. त्यानंतर मालिकेला वेगळं वळण लागलं आणि कार्तिक आणि दीपाच्या वाटा वेगळ्या झाल्या. 

तेव्हापासूनच प्रेक्षक दीपा आणि कार्तिक यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक होते. अखेर तो दिवस आलाच. दीपा आणि कार्तिक यांचा विवाहसोहळा पार पाडला. पण दीपाला कार्तिकचे रिपोर्ट बदलल्याचे सत्य माहीत नव्हते आखे आता दीपाला हे सत्य कळणार आहे.'रंग माझा वेगळा' या मालिकेत कार्तिक आणि दीपा यांच्या नात्यातील दुरावा नक्की कशामुळे झाला हे सगळ्यांनाच माहीती आहे. कार्तिकच्या टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने कार्तिकने या मुली माझ्या नाहीत म्हणून दीपा आणि तिच्या मुलींना सोडून दिले होते.अखेर ही टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने आता दीपिका आणि कार्तिकी आपल्याच मुली आहेत, हे कार्तिकने मान्य केलं आहे. तर, आता कार्तिक दीपाची माफी मागितली आणि मुलींचा स्वीकार करून दीपा बरोबर लग्न केले.यावेळी आयेशावर टेस्टची रिपोर्ट बदल्यांचा आरोप केला होता पण आयेशाने मी रिपोर्ट बदले नाही हे सत्य सांगितले. कार्तिकेची फर्टीलिटी टेस्टची रिपोर्ट ही श्वेताने आणि तिच्या आईने बदललेली होती. ७ वर्षे हि गोष्ट कुणालाच माहिती नव्हती पण आता दीपाला सत्य कळणार आहे.श्वेताने कार्तिकेचे फर्टीलिटी टेस्टची रिपोर्ट बदलले. आता दीपा श्वेताला त्याचा जाब विचारते तु माझ्या आयुष्यात विष पसरविण्याचे काम केले आहे, आमचं आयुष्य तु खराब केलं आहे आणि श्वेताला थोबाडीत मारते आहे. हा भाग लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने