“पवन शर्मा तुनिषाचा मामा नव्हे तर…” शिझान खानच्या बहिणीचा मोठा खुलासा

मुंबई: अभिनेत्री तुनिषा शर्माने २४ डिसेंबर रोजी मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येनंतर तिचा सह-कलाकार आणि बॉयफ्रेंड शिझान खानला पोलिसांनी अटक केली होती. शिझान खान सध्या पोलीस कोठडीत आहे. गेल्या आठवडाभरात शिझानवर तुनिषाच्या आईने गंभीर आरोप केले आहेत. तसेच तुनिषाच्या मृत्यूला त्यांनी शिझानला जबाबदार धरलं होतं. अशातच शिझानची आई आणि बहिणी फलक व शफाक नाज यांनी पत्रकार परिषद घेत या आरोपांना उत्तर दिलंय.तुनिषाची आई फक्त पैशांसाठी मुलीला काम करायला लावत होती. तुनिषाला शिकायचं होतं, फिरायचं होतं, पण तिच्या आईने तिला काहीच करू दिलं नाही, असा आरोप शिझानची बहीण फलकने केलाय. तुनिषा नैराश्यात होती, पण तरीही तिची आई तिला काम करायला लावत होती. ती बऱ्याचदा आपल्याला काम करायची इच्छा नसल्याचं आम्हाला सांगत होती, पण तिची आई तिला जबरदस्ती काम करायला भाग पाडत होती, असंही फलक पत्रकार परिषदेत म्हणाली.

दरम्यान, तुनिषाचा मामा म्हणून माध्यमांसमोर येणारा पवन शर्मा हा तिचा मामा नसल्याचा दावा शिझानच्या कुटुंबाने केला आहे. तो तिचा मामा नव्हे तर तिचा मॅनेजर होता, असं त्यांनी सांगितलं. पवन शर्मा आवश्यकतेपेक्षा जास्त तिच्या आयुष्यात हस्तक्षेप करत असल्याने तुनिषाने त्याला कामावरून काढलं होतं, असा दावाही त्यांनी केला आहे. तुनिषाला आम्ही गेल्या ५ महिन्यांत खूप आनंद दिला. ती आमच्याबरोबर फिरायला यायची, ती खूप खूश होती, पण ते तिच्या आईला पाहावत नव्हतं, असंही फलकने सांगितलं. तसेच शिझान आणि तिचं ब्रेकअप झालं नव्हतं, असा दावाही तिने केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने