"शिव भाऊ आहेस तु माझा...", हसवणारी फराह बिग बॉसच्या घरात झाली भावुक

मुंबई:  टिव्हीवरिल सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस 16’ हा शोमध्ये सध्या भांडण राडे हाणामारी हे सगंळच आपण पाहिलं. अर्चना आणि एम सी स्टॅनचा वाद असो किंवा शालिन आणि टिनाचं खोटं प्रेम प्रकरण हा शो सर्वांच मनोरंजन करत आहे.सध्या या घरात इमोशनल वातावरण तयार झालं आहे. या आठवड्यात घरात फॅमिली विक रंगणार आहे. घरातील सदस्याचे पालक घरात प्रवेश करतील आणि त्याच्यासोबत राहणार आहेत.यामुळं घरात एंट्री झाली ती साजिद खानची बहिण प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि निर्माती फराह खानची. ती तिच्या दिलखुलास स्वभावामुळं ओळखली जाते मात्र भावाला पाहिल्यानंतर ती खुरचं भावुक झाली. ती स्वत:ही रडली आणि पुर्ण मंडळीला पण रडवलं.. साजिद खानला पाहिल्यानंतर फराह खानचे अश्रूं अनावर झाले.निर्मात्यांनी या शोचा एक नवा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत फराह दिसते. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. प्रोमोच्या सुरवातीला घरातील सदस्य फ्रिज झालेले दिसत. फराह घरात येते आणि सादिला मिठी मारते.

त्याला पहाताच ती रडायला सुरुवात करते आणि यात फराह साजिदला म्हणाली की, ‘मम्मीला तुचा खूप अभिमान वाटेल!’ त्यानंतर फराह शिव ठाकरेकडे जाते. त्याला मिठी मारते आणि म्हणते, ‘भाऊ आहेस तू माझा’ त्यानंतर ती अब्दू रोजिकला भेटते आणि नंतर एमसी स्टॅनला भेटल्यानंतर ती म्हणाली की, 'मी इथे एक भाऊ सोडून गेली होती आणि आता तीन भाऊ घेऊन जाणार आहे. साजिद, तू लकी आहेस, तुला ही मंडली मिळाली आहे.'

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने